Sachin on Sreesanth's Retirement: भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीशांत (S. Sreesanth) याने बुधवारी 9 मार्च रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती (Sreesanth Retirement) घेतली. त्याने ट्वीट करत याबद्दल माहिती दिली. दरम्यान श्रीशांतच्या या निर्णय़ानंतर महान क्रिकेटपटू सचिनने एक खास इन्स्टाग्राम पोस्ट करत श्रीशांतला निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिनने श्रीशांत आणि त्याचा एका कसोटी सामन्यातील फोटो पोस्ट केला आहे. त्यात कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'तू कायमच एक कतृत्त्ववान गोलंदाज होतास, भारताचं प्रतिनिधित्त्व केल्याबद्दल अभिनंदन आणि दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा'. सचिनच्या या पोस्टला अनेकांनी लाईक केलं असून बऱ्याच कमेंट्स देखील करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे श्रीशांतने निवृत्ती घेताना सोशल मीडिया पोस्टच केली होती. भविष्यात खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंसाठी मी निवृत्ती घेत असल्याचं श्रीशांतने ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
श्रीशांतची कारकिर्द
श्रीशांतच्या कारकिर्दीचा विचार करता त्याने 27 कसोटी सामन्यात 87 विकेट्स, 53 एकदिवसीय सामन्यात 75 विकेट्स आणि 10 टी20 सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय आयपीएलमध्येही त्याने काही सामने गाजवले असून 44 आयपीएलच्या सामन्यात त्याने 40 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच कसोटी क्रिकेटमध्ये श्रीशांतने 281 धावा केल्या असून एकदिवसीय सामन्यात 44, टी20 सामन्यात 20 आणि आयपीएलमध्ये 34 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
- IND vs SL 2nd Test : भारताने श्रीलंकेचा डाव 109 धावांत आटोपला, टीम इंडियाकडे 143 धावांची आघाडी
- IND vs SL : ये रे माझ्या मागल्या! भारतानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनीही फेकल्या विकेट, दिवसभरात 16 गडी बाद
- IND vs SL : श्रेयस अय्यरची एकाकी झुंज, भारताचा पहिला डाव 252 धावांवर संपुष्टात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha