IND Vs SL, 2nd Test: बंगळुरुच्या (Bengaluru) एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात जसप्रीस बुमराहनं श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना माघारी घाडलं आहे. डे-नाईट क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा जसप्रीत बुमराह पहिला भारतीय गोलंदाज ठरलाय. 


या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ 252 धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून श्रेयस अय्यरनं 92 धावांची झुंजार खेळी साकारली. त्यानंतर फलंदाजी करण्यासा्ठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. श्रीलंकेचा संघाला पहिल्या डावात 109 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतानं पहिल्या दिवशी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही नेत्रदीपक कामगिरी करत 143 धावांची आघाडी घेतली आहे. 


जसप्रीत बुमराहची चमकदार कामगिरी
या सामन्यातील पहिल्या डावात जसप्रीत बुमराहनं कुशल मेंडिस, लाहिरू थिरिमाने, अँजेलो मॅथ्यूज आणि डिकवेलसारख्या फलंदाजांना बाद केलं. त्यानं 10 षटकात 24 धावा देत 5 विकेट्स घेतले. बुमराहनं 4 निर्धाव षटक टाकली. बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वोत्तम कामगिरी करणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात जसप्रीत बुमराहनं 24 धावा देऊन 5 विकेट्स घेतले. 


जसप्रीस बुमराहनं इशान शर्माचा विक्रम मोडला
कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम भारताचा वेगवान गोलंदाज इशान शर्माच्या नावावर होता. श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटी सामन्यात इशांतनं 54 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या. हा सामना 2015 साली खेळला गेला होता. या यादीत व्यंकटेश प्रसाद तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 2001 साली कॅंडी येथे झालेल्या कसोटी सामन्यात त्याने 72 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर झहीर खाननेही मुंबई कसोटीत ही अप्रतिम कामगिरी केली होती. झहीरनं 72 धावांत 5 विकेट्स घेतले होते.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha