IND vs SL 2nd Test Day 2 : भारत विरुद्ध श्रीलंका पिंक बॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने श्रीलंकेचा पहिला डाव 109 धावांवर आटोपला. भारताकडे आता पहिल्या डावात 143 धावांची आघाडी आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामना खेळवला जात आहे. श्रीलंकेच्या उरलेल्या चार विकेट्स घेण्यासाठी भारताला दुसऱ्या दिवशी अर्धा तासही लागला नाही. भारताने 143 धावांची मोठी आघाडी घेतली आहे. विरोधी संघाला बाद करण्यासाठी भारताला फक्त 35 चेंडू पुरेसे ठरले.


भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांनी पहिल्या अर्ध्या तासात प्रत्येकी दोन विकेट घेतल्याने भारताने श्रीलंकेला 109 धावांत गुंडाळले आणि 143 धावांची आघाडी मिळवली. बुमराहने घरच्या भूमीवर कसोटीतही पहिले पाच बळी मिळवले. पाहुण्या संघआला डाव आटोपण्यासाठी टीम इंडियाला केवळ 5.5 षटके पुरेशी ठरली. 






 


भारताकडून शानदार दबाव कायम राहिल्याने टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आहे. फर्नांडो हा श्रीलंकेचा बाद होणारा शेवटचा खेळाडू ठरला, त्याला अश्विनने यष्टीचीत केले. भारताविरुद्ध श्रीलंकेची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. या मालिकेत त्यांनी अद्याप 200 धावाही गाठलेल्या नाहीत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha