Sachin Tendulkar, Sydney Cricket Ground : क्रिकेटचा देव अर्थात सचिन रमेश तेंडुलकर याने आज 50 वर्ष पूर्व केले. सचिन तेंडुलकर आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुकलर याला अनेक गिफ्ट मिळाले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही सचिन तेंडुलकरला खास गिफ्ट दिलेय... क्रिकेट ऑस्ट्र्रेलियाने सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या एका गेटला सचिन तेंडुलकर याचे नाव दिलेय. विशेष म्हणजे... सचिन तेंडुलकर याच्या वाढदिवसाला (24 एप्रिल) या गेटचे अनावरण करण्यात आलेय. सचिन तेंडुलकर याच्यासोबतच ब्रायन लारा या दिग्गजाचाही सन्मान केलाय.  


क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकली यांनी सचिन तेंडुलकरच्या गेटचे अनावरण केलेय. यावेळी ते म्हणाले की, आज क्रिकेटविश्व सचिन तेंडुलकरचा 50 वा वाढदिवसाचा उत्सव साजरा करत आहे. अशातच सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या दिग्गजांचा सन्मान करण्यात येतोय. या दोन्ही खेळाडूंच्या रोकॉर्डचा सन्मान करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. या दोन्ही खेळाडूमुळे अनेक संघ आणि खेळाडू प्रोत्साहित होतील, यात शंकाच नाही.


सचिन तेंडुलकर याने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पाच कसोटी सामने खेळले आहे. या मैदानावर सचिनची फलंदाजीची सरासरी 157 इतकी आहे. सचिन तेंडुलकर याने या मैदानावर तीन शतकांसह 785 धावा चोपल्या आहेत. यामध्ये एका द्विशतकाचा समावेश आहे. जानेवारी 2004 मध्ये सचिन तेंडुलकर याने या मैदानावर 241 धावांची नाबाद खेळी केली होती. त्याशिवाय ब्रायन लारा याने आपल्या क्रिकेट करिअरचे पहिले शतक सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झळकावले होते. 1993 मध्ये लाराने या मैदानावर 277 धावांची खेळी केली होती. या मैदानावर सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांनी अनेक विक्रमाला गवसणी घातली आहे. त्यामुळेच गेटचे नाव ब्रायन लारा-सचिन तेंडुलकर गेट्स असे ठेवलेय. 






सचिन तेंडुलकर काय म्हणाला ? 


भारताबाहेर सिडनी माझं सर्वात आवडते मैदान आहे. 1991-92 माझ्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासूनच या मैदानासोबत माझ्या खास आठवणी आहेत. एससीजीच्या गेटला नाव दिले.. हा माझा मोठा सन्मान आहे, असे सचिन तेंडुलकर म्हणाला. 


आणखी वाचा :


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे 'हे' पाच विक्रम मोडणं अतिशय कठीण, याच्याजवळ एकही फलंदाज नाही 


एअरपोर्टवर पहिली भेट, पहिल्या भेटीतच जडलं प्रेम, अशी आहे सचिन तेंडुलकरची फिल्मी लव्हस्टोरी 


वाढदिवसानिमित्त सचिनवर शुभेच्छांचा पाऊस; सेहवागच्या दिल्या हटके शुभेच्छा, शीर्षासन करत म्हणाला...