Mohammed Siraj's Apology : बंगलोरच्या मैदानावर आरसीबीने राजस्थानचा सात धावांनी पराभव करत रॉयल विजय मिळवला. आरसीबीने हा सामना जिंकला पण मोहम्मद सिराजला आपल्या जोडीदाराला शिविगाळ देताना स्पॉट करण्यात आले. 19 वे षटक फेकण्यासाठी सिराज आला होता..त्यावेळी हा सर्व प्रकार घडला. मोहम्मद सिराज याने याबाबत दोन वेळा माफी मागितली. त्यावर त्या खेळाडूने अशा गोष्टी होत असतात असे म्हणत मोठ्या मनाने माफ केले.
राजस्थानला अखेरच्या दोन षटकार 30 धावांची गरज होती. 19 वे षटक मोहम्मद सिराज टाक होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर ध्रुव जुरेल याने मोहम्मद सिराज याला जबरदस्त षटकार लगावला. त्यानंतर पुढील चेंडूला लाँग ऑनला मारले... तिथे महिपाल लोमरोर फिल्डिंग करत होता.. महिपाल याने थ्रो करण्यास उशीर केला.. त्यामुळे सिराज ध्रुव जुरेलला धावबाद करु शकला नाही... त्यामुळे भरमैदानात सिराज भडकला अन् लोमरोर याला शिविगाळ केली.
दरम्यान, मोहम्मद सिराज याला आपली चूक समजली... त्याने तात्काळ महिपाल लोमरोर याची माफी मागितली. महिपाल लोमरोर यानेही मोठ्या मनाने सिराजला माफ केले. महिपाल लोमरोर भारताचा युवा खेळाडू आहे. अद्याप त्याला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. त्याने आयपीएलमध्ये 23 सामन्यात 308 धावा केल्या आहेत. अटीतटीच्या सामन्यात आरसीबीने राजस्थानचा पराभव केला. या विजयासाह आरसीबीने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर राजस्थानचा संघ दुसऱ्या स्थानावर घसरलाय.
सामन्यात काय झाले ?
RCB vs RR, IPL 2023 : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आरसीबीने राजस्थानवर रॉयल विजय मिळवला. दोन रॉयलमध्ये झालेल्या लढतीत आरसीबीने बाजी मारली. आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा सात धावांनी पराभव केला. आरसीबीने दिलेल्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने निर्धारित २० षटकात १८९ धावांपर्यंत मजल मारली. मॅक्सवेल, फाफ डु प्लेसिस आणि हर्षल पटेल आरसीबीच्या विजयाचे सुत्रधार राहिले. मॅक्सवेल आणि फाफ यांनी वादळी अर्धशतके झळकावली. त्यानंतर गोलंदाजीत हर्षल पटेलने तीन विकेट घेतल्या.