Sachin Tendulkar Birthday : जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) आज 50 वा वाढदिवस आहे. क्रिकेटच्या दुनियेतील महान क्रिकेटपटू म्हणून सचिनची ओळख आहे. त्याचे भारतासह जगभरात लाखो-कोटी फॅन्स आहेत. त्याच्या वाढदिसाचं निमित्त साधून जगभरातील फॅन्स या महान क्रिकेटपटूला भरभरुन शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्याच्या क्रिकेटमधील विक्रमी कामगिरीमुळे त्याला 'क्रिकेटचा देव' म्हणूनही ओळख जातं. पण सचिनने आपल्या दीर्घ किक्रेट कारकिर्दीत फिटनेसकडे जास्त लक्ष दिले आहे. आज भलेही आपला सर्वांचा लाडका सचिन 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण आजही पन्नाशीत असून स्वत:च्या फिटनेसकडे जास्त लक्ष देतो. त्यामुळे विशी-पंचवीशीच्या तरुणांनाही लाजवेल असं त्याचं फिटनेस आहे. त्याचं क्रिकेटच्या खेळावर प्रचंड प्रेम आहे. दहा वर्षापूर्वी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकणारा सचिन आजही क्रिकेटच्या पीचवर सराव करताना दिसून येत असतो. इथेच सचिनचं वेगळेपण दिसून येतं. पण आज आपण महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या फिटनेचं रहस्य जाणून घेऊया..


अनेक पुरस्कारांचा मानकरी 


सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला 15 नोव्हेंबर 1989 रोजी सुरुवात केली आणि 16 नोव्हेंबर 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या 24 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रवासात त्याने 600 पेक्षा जास्त सामने खेळताना 34,000 हून अधिक धावांचा पाऊस पाडला आहे. यासोबत जगात सर्वाधिक 100 शतके बनवण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याच्या या विक्रमाच्या जवळपासही कुणी नाही. फक्त विराट कोहलीने 71 शतके बनवून दुसऱ्या क्रमांवर आहे. सचिनला आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले असून त्याआधी क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासह अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


आपल्या फिटनेसची सचिन अशी घेतो काळजी


विक्रमवीर आज भलेही पन्नाशीत आहे. पण आपल्या फिटनेसची खूप काळजी घेतो. सचिनची उंची 5 फूट 5 इंच इतकी असून त्याच वजन जवळपास 60 किलोपर्यंत असल्याचं समजतं. आपल्या शरीराला एनर्जेटिक ठेवण्यासाठी सचिन दिवसभरात कमीत कमी 2800-3000 कॅलरीज बर्न करत असतो. यासाठी त्याने एक खास डाएट प्लॅन तयार केलं आहे. यामध्ये 40 टक्के कार्बोहायड्रेट, 30 टक्के हेल्दी फॅट आणि 30 टक्के प्रोटिनयुक्त आहाराचा समावेश आहे. सचिन हेल्दी डाएटसोबत मैदानात खूप सराव आणि व्यायाम करतो. त्याच्या आहारातील यादीत डाळ, दूध, पानी, फळ, सलाड, दही, स्नायूंच्या फिटनेसाठी प्रोटीन पावडर, चपाती, मनुके खोबरं आणि शेंगदाणे यांचा समावेश आहे. मुळात सचिन पक्का खवय्या आहे. त्याला वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारायला अजूनही आवडतं. सोशल मीडियावर तसं त्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सचिनला काही परदेशी डिश खायला आवडतात. त्याला भारतीय, जपानी, मलेशियन फूड खायला प्रचंड आवडतं. सर्वसामान्यांप्रमाणे सचिनलाही महाराष्ट्रीय फूड वडापाव खायला खूप आवडतं. तसेच तो आपल्या डाएटमध्ये उकळलेले मासे, दाळ, चपाती आणि दही आणि सलाड यांचा समावेश आहे.


सचिनने स्वत: ला फिट ठेवण्यासाठी हे पदार्थ टाळतो? 


सचिन कितीही खवय्येगिरी करत असला त्याला उकडलेले मासे, डाळ आणि उकडलेला भात जेवणात खात असतो. त्याला जेवणात कोणत्याही प्रकारचे मसाले आवडत नाहीत.


गोड पदार्थ टाळतो


सचिनला गोड पदार्थ खायला अजिबात आवडत नाही. जेवण केल्यानंतर त्याला आईस्क्रीम खायला आवडतं. पण फळे आणि नारळापासून बनवलेली खास आईस्क्रीम खायला त्याला आवडतं.


दररोज योगा आणि व्यायाम करतो


स्वत: ला फिट ठेवण्यासाठी सकाळी लवकर उठतो आणि योगा आणि शारीरिक कसरत करणारा व्यायाम करतो. पण सचिन डाएटपेक्षाही जास्त आपल्या जिमवर विशेष लक्ष देतो.


दुपारचं हलकं आणि साधं जेवण खातो


सचिन इतका श्रीमंत क्रिकेटपटू असूनही साधं जेवण खायला आवडतं. त्याच्या सकाळच्या नाष्ट्यात फळांच्या सलाडचा समावेश असतो, तर दुपारचं आणि रात्रीचं जेवणही साधचं करतो. विशेष म्हणजे सचिनला दुपारच्या जेवणात फक्त तीन चपात्यांचा समावेश असतो. या डाएट प्लॅनवरुच समजलं असेल की आजही सचिन तरुणांसारखा फिट आणि हेल्दी असल्याचं दिसून येतं.