एक्स्प्लोर

Sachin Tendulkar : साराच्या हाती जळण, सचिनच्या हाती फुकणी, अंजलीची फोडणी, तेंडुलकरांचा गावरान गोडवा

Sachin Tendulkar Birthday : क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याने 24 एप्रिल रोजी 50 वा वाढदिवस साजरा केला.

Sachin Tendulkar Birthday : क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याने 24 एप्रिल रोजी 50 वा वाढदिवस साजरा केला. सचिन तेंडुलकर याने अतिशय साधेपणाने वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तेंडुलकर कोकणात गेला होता. सहकुटुंब त्याने साधेपणाने वाढदिवस साजरा केला होता. आज सचिन तेंडुलकर याने वाढदिवसादिवशी काढलेला एक फोटो पोस्ट केला आहे. मराठमोळ्या संस्कृतीची ओळख असलेला फोटो पोस्ट करत सचिन याने चाहत्यांचे लक्ष वेधलेय. या फोटोमध्ये सचिन तेंडुकलकर, पत्नी अंजली आणि मुलगी सारा दिसत आहेत.

सचिन तेंडुलकर फुकणीने चुलीचा जाळ लावत असल्याचे दिसतेय. चुलीवरील भांड्यात अंजली काहीतरी करत असल्याचे दिसतेय. त्याशिवाय सोबत साराही आहे. या फोटोवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव पडत आहे. सचिन तेंडुलकर याने फोटो पोस्ट करताना खास पोस्टही टाकली आहे. यामध्ये त्याने म्हटलेय की,  "तुम्ही प्रत्येक दिवशी अर्धशतक झळकावू शकत नाही, पण जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा त्याला सर्वात जास्त महत्त्व असते. अलीकडेच एका शांत गावात माझ्या टीमसोबत, माझ्या कुटुंबासोबत 50 वा वाढदिवस साजरा केला. अर्जुन आयपीएलमध्ये व्यस्त असल्याने त्याची खूप आठवण येत आहे." 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 24 एप्रिल रोजी आयुष्याचे अर्धशतक पूर्ण केले.  सचिन आपला 50 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी  कोकणात गेला होता. त्याने भोगवे येथील समुद्रकिनारी साध्या पद्धतीने कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला.  अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये व्यस्त असल्यामुळे कोकणात गेला नव्हता. सचिनने कुटुंबियांसह मित्रमंडळींनी गाण्यांच्या मैफिलीसह आनंद लुटला. सचिनने आपला पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केली. सचिनने माचली रिसॉर्ट फिरून पाहिले आणि समाधान व्यक्त केले. कुटुंबिय व सहकाऱ्यांसह त्याने गप्पा-गाण्यांची मैफिल रंगविली. दिवसभर सचिन मित्रांच्या गराड्यात गप्पांमध्ये रमला होता.

"भरलेला बांगडा, कोळंबी फ्राय, 'माशाचा मालवणी तिखला,' कोंबडी रस्सा, वडे-सागोती, गोलमा अशा अस्सल झणझणीत मत्स्याहारी आणि मांसाहारी मालवणी पदार्थांवर यथेच्छ ताव मारत 'क्रिकेटच्या देवा'ने अर्थात खवैय्या सचिन तेंडुलकरने या सुग्रास भोजनाला दिलखुलास दाद दिली. परुळे येथील माचली रिसॉर्टला सचिन, पत्नी अंजली तेंडुलकर, कन्या सारा तेंडुलकर व सचिनच्या मित्रांनी भेट दिली. आपल्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त भोगवे दौऱ्यावर आलेल्या सचिनने खास मालवणी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. शाकाहारी पदार्थांमध्ये आमरसासह हापूस आंबे तसेच कैरीचे लोणचे, कैरीची चटणी, सांगितले. कंद मुळाची भाजी, काजू-शहाळ्याची भाजी, भात, सोलकढी, निरफणसाची कापे, बोंडू रायता अशा पदार्थांचीही यावेळी रेलचेल होती. सचिनचे कुटुंब आणि मित्र मिळून सुमारे तीसजणांनी या पंक्तीत एकत्र जेवण घेतले.

महत्त्वाच्या बातम्या

Australian 2018 Ball-Tampering Scandal : 7 वर्षं पोटात ठेवलं, अखेर 'त्या' काळ्या दिवसांबाबत कॅमेरून बॅनक्रॉफ्टने सगळंच सांगितलं! टॅम्परिंग प्रकरणात नवे खुलासे, ऑस्ट्रेलियात खळबळ
7 वर्षं पोटात ठेवलं, अखेर 'त्या' काळ्या दिवसांबाबत कॅमेरून बॅनक्रॉफ्टने सगळंच सांगितलं! टॅम्परिंग प्रकरणात नवे खुलासे, ऑस्ट्रेलियात खळबळ
IND Vs NZ 1st Test Day-1 : बुमराहच्या भेदक माऱ्यानंतर निकोल्स-फिलिप्सचा पलटवार; गिलचा पंचांशी वाद, दुसऱ्या सत्रात न्यूझीलंडने सामन्याचं चित्र पालटलं, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
बुमराहच्या भेदक माऱ्यानंतर निकोल्स-फिलिप्सचा पलटवार; गिलचा पंचांशी वाद, दुसऱ्या सत्रात न्यूझीलंडने सामन्याचं चित्र पालटलं, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
IND vs NZ 1st Test Day-1 : बुमराहचा सापळा अन् जैस्वालचा अद्भुत कॅच! मिचेलची विकेट पडताच गिल मैदानात पळत सुटला, VIDEOमध्ये पाहा सामन्याचा सर्वात मोठा 'टर्निंग पॉइंट'
बुमराहचा सापळा अन् जैस्वालचा अद्भुत कॅच! मिचेलची विकेट पडताच गिल मैदानात पळत सुटला, VIDEOमध्ये पाहा सामन्याचा सर्वात मोठा 'टर्निंग पॉइंट'
IND vs NZ 1st Test Day-1 : बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Forest Department Scam : झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Local Train: रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
Chhatrapati Sambhajinagar: रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Pune News : ऊन घेण्यासाठी गच्चीवर जातो असं सांगून गेले, इमारतीच्या आवारात बॉडी सापडली; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
ऊन घेण्यासाठी गच्चीवर जातो असं सांगून गेले, इमारतीच्या आवारात बॉडी सापडली; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
IND vs NZ 1st Test Day-1 : बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
Rudransh Thakur Viral Video: हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
Maharashtra Live blog updates: अखेर शायना एनसींनी माफी मागितली, पोस्ट करत म्हणाल्या 'माझ्या कृतीचा विपर्यास केला'
Maharashtra Live blog updates: अखेर शायना एनसींनी माफी मागितली, पोस्ट करत म्हणाल्या 'माझ्या कृतीचा विपर्यास केला'
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
Embed widget