Team India: टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या (Team India) मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची (Gautam Gambhir) नियुक्ती करण्यात आली. आगामी भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि वन-डे मालिका गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिली मालिका असणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी अशा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे, ज्यांची कदाचित कोणालाच अपेक्षा नव्हती. तसेच झिम्बॉब्वे दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही. यावरुन भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू एस. बद्रीनाथ बीसीसीआयवर चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले. 


टीम इंडियाच्या निवडीवर माजी खेळाडू हरभजन सिंग, मोहम्मद कैफ यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आता सुब्रमण्यम बद्रीनाथच्या विधानाने देखील नवीन वादाला सुरुवात झाली आहे. क्रिक डिबेट विथ बद्रीवर बोलताना म्हणाला की, काहीवेळा कामगिरीव्यतिरिक्त संघात स्थान मिळवण्यासाठी दुसरी प्रतिमा देखील आवश्यक असल्याचं आता वाटतंय. ऋतुराज गायकवाडसारख्या खेळाडूची टीम इंडियात निवड होत नाही. त्यामुळे संघात स्थान मिळवायचं असेल तर तुमचं बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर रिलेशन असणं, प्रसारमाध्यमांबरोबर तुम्हाला नीट संगनमत करता येणं आणि अंगावर टॅट्यू असणं गरजेचं आहे का?, असा सवाल ब्रदीनाथने उपस्थित केला. दरम्यान ऋतुराजने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये 7,77 आणि 49 धावा केल्या होत्या. त्याला शेवटच्या म्हणजेच पाचव्या टी-20 सामन्यात संधी देण्यात आलेली नव्हती. 






हार्दिक पांड्याला संधी का नाही? 


हार्दिक पांड्यानं संघ निवड जाहीर होण्यापूर्वी एकदिवसीय मालिकेतून वैयक्तिक कारणामुळं माघार घेतली होती. निवड समितीनं  2026 च्या टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं संघाची बांधणी करण्याचा विचार केला असावा त्यामुळं सूर्यकुमार यादवला नेतृत्त्व करण्याची संधी दिली गेली. हार्दिक पांड्याच्या दुखापतीचा मुद्दा विरोधात गेला असण्याची शक्यता आहे. गौतम गंभीरनं केकेआचा प्रशिक्षक असताना सूर्यकुमार यादवला उपकर्णधारपद दिलं होतं. आता गंभीरचं प्रशिक्षक झाल्यानं सूर्यकुमार यादवचं नाव वरचढ होतं. हार्दिक पांड्याचा फिटनेस हा सातत्यानं पाहायला मिळत नाही. हार्दिकला सातत्यानं विश्रांती घ्यावी लागते. कर्णधारानं संघाला प्रेरणा देण्यासाठी मैदानावर असणं आवश्यक असतं त्यामुळं ही संधी हार्दिकच्या हातून निसटली आहे.  हार्दिक पांड्याकडे श्रीलंका दौऱ्यात उपकर्णधारपद देखील असणार नाही. 


संबंधित बातम्या:


हार्दिकने कोणतीही चुकीची गोष्ट केली नव्हती, गंभीरची वेगळी रणनीती असेल, पण...; मोहम्मद कैफ रोखठोक बोलला!


हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट; भारताबाहेर गेल्यावर काय करतेय?