कोलकाता : टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या (T20 World Cup 2024) अंतिम फेरीच्या लढतीत भारत आणि दक्षिण आफ्रिका(Ind vs South Africa) आमने सामने येणार आहे. भारताकडे 2007 नंतर पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे.तर, 2013 नंतर भारताला अनेक प्रयत्न करुन देखील आयसीसी स्पर्धांचं विजेतेपद मिळवता आलेले नाही. आज टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत विजय मिळवून आयसीसी स्पर्धांच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टीम इंडियाकडे आहे. भारताचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआयचा माजी चेअरमन सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) रोहित शर्माबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
सौरव गांगुलीनं एका कार्यक्रमात म्हटलं की, रोहित शर्मासाठी खूप आनंदी आहे. हेच जीवनाचं चक्र आहे, सहा महिन्यांपूर्वी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन देखील नव्हता. आता रोहितच्या नेतृत्त्वात भारत टी 20 वर्ल्ड कपची अंतिम फेरीची लढत खेळणार आहे. विराट कोहलीनं वेळी कॅप्टनपद सोडल्यानंतर रोहित शर्मा ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नव्हता.
रोहित शर्मानं दोन वर्ल्ड कप फायनल खेळल्या आहेत. आतापर्यंत रोहितच्या टीमला कोणीही पराभूत करु शकलेलं नसून ते स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहेत. यातून रोहित शर्माच्या नेतृत्व गुणांचं दर्शन होतं. मला रोहित शर्माच्या यशाबद्दल आश्चर्य वाटत नाही कारण त्यावेळी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो.
विराट कोहलीला त्यावेळी कॅप्टन राहायचं नव्हतं.तेव्हा रोहित शर्माला कॅप्टन पदाची जबाबदारी घेण्यास तयार करण्यासाठी खूप वेळ लागल्याचं सौरव गांगुलीनं सांगितलं. कारण, रोहित शर्मा त्यावेळी कॅप्टनपद स्वीकारण्यास तयार नव्हता, असं दादानं सांगितलं.
रोहित शर्माला कॅप्टन करण्यामध्ये आम्हा सर्वांना खूप मेहनत घ्यावी लागली. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेटची प्रगती पाहून खूश असल्याचं देखील सौरव गांगुलीनं म्हटलं.
आयपीएलची स्पर्धा खूप वेळ चालत असल्यानं त्याचं विजेतेपद मिळवणं अनेकदा खूप आव्हात्मक असतं, असंही सौरव गांगुलीनं म्हटलं. रोहित शर्मानं पाचवेळा आयपीएल विजेतेपद जिंकलं आहे, हे देखील सर्वात मोठं यश आहे. आयपीएल जिंकणे देखील अनेकदा कठीण असतं, असंही गांगुली म्हणाला.
तुम्हाला आयपीएल जिंकण्यासाठी 16-17 मॅच जिंकायच्या असतात. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आठ ते नऊ सामने जिंकण्याची गरज असते. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तुम्हाला अधिक सन्मान मिळतो. रोहित शर्मा भारताला विजेतेपद मिळवून देईल, असा विश्वास असल्याचं गांगुली म्हणाला.
सौरव गांगुली म्हणाला की सात महिन्यात रोहित शर्मा दुसरी वर्ल्ड कप फायलन हरणार नाही.तसं झालं तर तो बारबाडोसच्या महासागरात उडी मारेल. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारत विजयानं अभियानाचा समारोप करेल, असं सौरव गांगुली म्हणाला.
संबंधित बातम्या :
IND vs SA : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड