Rohit Sharma on Champions Trophy 2025 : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. यानंतर, जेव्हा खेळाडू ट्रॉफी जिंकून परतले, तेव्हा मुंबईत एक रोड शो आयोजित करण्यात आला होता. यानंतर, मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) जल्लोष झाला. 


त्याच वानखेडे स्टेडियमच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा, महान फलंदाज सचिन तेंडुलकर, माजी फलंदाज सुनील गावसकर, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि महान फलंदाज अजिंक्य रहाणे यांसारखे स्टार खेळाडू त्यात सहभागी झाले होते. यादरम्यान, वानखेडे स्टेडियमवर सर्वांदेखत रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा मुंबईला आणण्याचा 'विडा' उचलला.


वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यादरम्यान रोहित शर्मा म्हणाला की, टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आम्हाला बार्बाडोसमधील एका हॉटेलमध्ये बंद करण्यात आले होते. पण आम्हाला चाहत्यांसोबत जल्लोष साजरा करायचा होता. लहानपणापासून येथे खेळण्याचे स्वप्न आम्ही मी पाहिले होते. टीम इंडियाचा असो या आयपीएल येथे कोणताही सामना खेळताना चाहत्यांनी कायम प्रोत्साहित केले आहे. त्यामुळेच, येथे खेळण्याचा नेहमीच विशेष आनंद असतो. यासाठी येथे टी-20 वर्ल्ड कप घेऊन येण्याची माझी इच्छा होती.'


पुढे रोहित शर्मा म्हणाला की, याआधी 2007 सालचा टी-20 वर्ल्ड कप येथे आणण्याचा आनंद अनुभवलेला होतो. तेव्हा मी युवा खेळाडू होतो. पण, यावेळी मला स्वतःला येथे वर्ल्ड कप आणायचा होता. आणि 2007 मध्ये जे घडले होते, पुन्हा एकदा तो अनुभवायचा होता. टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आम्ही दिल्लीहून येथे येईपर्यंत संपूर्ण वानखेडे स्टेडियम खचाखच भरले होते. तो दिवस आणि चाहत्यांचा तो उत्साह कधीच विसरता येणार नाही.




रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत केली मोठी घोषणा!


रोहित म्हणाला की, भारतीय संघ लवकरच चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेला सुरुवात करेल आणि मुंबईच्या या प्रतिष्ठित स्टेडियममध्ये आणखी एक ट्रॉफी आणण्याचा प्रयत्न करेल. मला खात्री आहे की जेव्हा आपण दुबईला पोहोचू तेव्हा 140 कोटी लोकांच्या शुभेच्छा आपल्या मागे असतील. आम्हाला हे माहित आहे. ही ट्रॉफी (आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी) वानखेडेवर परत आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.”


हे ही वाचा -


Mohammed Siraj : टीम इंडियामधून वगळल्यानंतर DSP सिराजने उचलले मोठे पाऊल, अचानक घेतला 'हा' निर्णय