Sachin Tendulkar and Rohit Sharma, Mumbai : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या(MCA) वानखेडे स्टेडियमला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई क्रिकेटचा गौरव वाढवणाऱ्या या स्टेडियमचा 50 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी आज वानखेडेमध्ये खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर, सचिन तेंडूलकर, रवी शास्त्री यांच्यासह कर्णधार रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांनी आपले विचार मांडले. याशिवाय राजकीय क्षेत्रातील काही मान्यवर मंडळी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, भाजप नेते आशिष शेलार यांनीही आपले विचार मांडले. 


दरम्यान, आजच्या या कार्यक्रमात सचिनने अप्रत्यक्षपणे कर्णधार रोहित शर्माला मारलेल्या शा‍ब्दिक टोल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी खेळवण्यात आलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये काही वाद सुरु असल्याचं समोर आलं होतं. यावेळी कर्णधार रोहित शर्मा याने ड्रेसिंग रुममधील काही वादग्रस्त बाबी माध्यमांसमोर शेअर केल्या होत्या. दरम्यान, आजच्या कार्यक्रमात सचिनने वडपावचा किस्सा सांगत रोहित शर्माला टोला लगावल्याचे बोलले जात आहे. 


सचिन नेमकं काय काय म्हणाला? 


सचिन म्हणाला, आमच्या ड्रेसिंग रुममधील एका खेळाडूची सवय होती, त्याला म्हटलं की तू बॉलिंग करणार आहे. तर तो ड्रेसिंग रुममध्ये जाऊन बुट घालायचा. कधी बॅटिंगला जायला सांगितले तर डब्यातून काही खायचा. मात्र, ऐकेदिवशी आमच्या टीममधील दोन खोडकर मुलांनी ड्रेसिंग रुममध्ये गेले. आणि त्याचा डब्बा खाल्ला. त्याच्या डब्यातील सगळे वडापाव खाल्ले...त्यानंतर तो प्लेअर पॅड घालण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये गेला, तेव्हा त्याला डब्बा मोकळा दिसला. मग तो रागात बाहेर आला...सर्वांना विचारू लागला माझा डब्बा कोणी खाल्ला.? त्याने दंगा सुरु केला. प्रॅक्टिस थांबवा..डब्बा कोणी खाल्ला त्याचं पोट खराब होईल, असं म्हणाला. तो अर्धातास ओरडत होता..मात्र, नाव कोणीही सांगितले नाही...या गोष्टीला तीस वर्षे उलटले पण ते आम्ही सांगितलं नाही...आम्ही भेटल्यावर त्यावर चर्चा होते...पण आजवर आम्ही ते कोणालाही सांगितलं नाही. ड्रेसिंग रुममधील गोष्टी ड्रेसिंग रुममध्येच ठेवलं...मी आताही हे सांगणार नाही..




इतर महत्त्वाच्या बातम्या


मंत्रि‍पदाचा कोट मिळाला, पण पालकमंत्री तटकरे झाल्या, गोगावलेंच्या संतापलेल्या 32 समर्थकांचे राजीनामे