IND vs SL 1st ODI India's Predicted Playing XI: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्या आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका कोलंबो मैदानावर खेळण्यात येणार आहे. याआधी झालेल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेच्या 3-0 अशा फरकाने पराभूत केला होता.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीसह (Virat Kohli) अनेक वरिष्ठ खेळाडू पुन्हा एकदा एकत्र दिसतील. त्यामुळे एकदिवसीय संघात अनेक बदल पाहायला मिळेल. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या आजच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
टीम इंडियाची टॉप ऑर्डर कशी असेल?
कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला उतरतील. तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. दरम्यान विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या जागेची अदलाबदल देखील होऊ शकते. म्हणजेच विराट कोहली रोहित शर्मासोबत सलामीला खेळतानाही दिसू शकतो.
टीम इंडियाची मिडल ऑर्डर-
मधल्या फळीची सुरुवात श्रेयस अय्यरपासून होऊ शकते. यानंतर केएल राहुल पाचव्या क्रमांकावर दिसू शकतो. एकदिवसीय मालिकेत ऋषभ पंतच्या जागी केएल राहुलला प्राधान्य दिले जाऊ शकते. यानंतर रियान पराग सहाव्या क्रमांकावर दिसू शकतो. भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रियान पराग वनडेमध्येही पदार्पण करू शकतो. परागने टी-20 मालिकेत उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी दाखवली, हे लक्षात घेऊन त्याला एकदिवसीय संघात स्थान मिळू शकते. त्यानंतर अष्टपैलू अक्षर पटेल सातव्या क्रमांकावर दिसू शकतो. याशिवाय गोलंदाजीत कुलदीप यादवकडे मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून पाहिले जाऊ शकते. तर वेगवान गोलंदाजीत मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि खलील अहमद मैदानात उतरतील.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रायन पराग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, खलील अहमद.
श्रीलंकेचा संपूर्ण संघ-
चारिथ असलांका (कर्णधार), पॅटम निसांका, अविश्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सादिरा समराविक्रम, कामिंदु मेंडिस, झेनिथ लियानगे, मोहम्मद शिराज, वानिंदु हसेरंगा, डुनिथ व्हेलागे, महिरन्के एक फर्नांडो, इशान मलिंगा.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक-
2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)
4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)
7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो)
संबंधित बातमी:
गौतम गंभीर-सूर्यकुमार यादवचे 4 चक्रवणारे निर्णय; श्रीलंकेच्या थिंक टँकने विचारही केला नव्हता!