मुंबई:  रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात भारतानं दक्षिण आफ्रिकेला (South Africa) टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पराभूत केलं. भारतानं तब्बल 17 वर्षांनी दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कपच्या विजेतेदावर नाव कोरलं. भारताचा कर्णधार रोहित शर्माने शनिवारी अंतिम फेरीतील लढतीवेळी घडलेला एक प्रसंग सांगितला. हा प्रसंग रिषभ पंतशी संबंधित होता. रिषभ पंतने खेळलेल्या एका चालीमुळे दक्षिण आफ्रिकेला मोठा फटका बसला. रोहित शर्माने हे उलगडून सांगितले आहे. तो द कपिल शर्मा शो मध्ये बोलत होता.


रोहित शर्मा म्हणाला अंतिम सामन्यात ज्यावेळी दक्षिण आफ्रिका मॅच जिंकणार अशा स्थितीत होती त्यावेळी रिषभ पंत याने खेळाचा वेग कमी करण्यासाठी एक चाल खेळली. रिषभ त्यात यशस्वी देखील झाला. आफ्रिकेला ज्यावेळी 30 बॉल मध्ये 30 धावा हव्या होत्या तेव्हा रिषभने दुखापतीच्या कारणासाठी मॅच काही वेळ थांबवली. यामुळे आफ्रिकन फलंदाजांची लय बिघडली आणि याचा काही प्रमाणात फायदा भारताला झाला.


रोहित शर्मा म्हणाला ज्यावेळी आफ्रिकेला ज्यावेळी 30 बॉल मध्ये 30 धावा हव्या होत्या तेव्हा खेळ काही वेळ थांबला होता. रिषभने त्यावेळी डोकं चालवलं आणि मॅच आणखी काही वेळ थांबवण्यात यश मिळालं. रिषभच्या गुडघ्याला दुखापत होती, त्यानं त्यावर टेप लावून घेतली आणि मॅचचा वेग कमी झाला, असं रोहितने म्हटले. त्यावेळी फलंदाज आक्रमक होते,ते वेगात धावा काढत होते, त्यांना आणखी काही बॉल खेळायचे होते.


अन् रिषभ पंत खाली पडला होता...


रोहित शर्मा म्हणाला,आम्हाला आफ्रिकेच्या फलंदाजांची लय बिघडवायची होती. मी फिल्डींग लावत होतो, गोलंदाजांसोबत बोलत होतो. तेव्हा पाहिले की रिषभ पंत खाली पडला होता, फिजिओथेरेपिस्ट त्याच्या  गुडघ्यावर टेप लावत होते. क्लासेन मॅच पुन्हा सुरु होण्याची वाट पाहत होता.रिषभ मुळे खेळाचा वेग कमी करण्यात यश मिळालं. आम्हाला याचा फायदा झाला, पंतसाहेबांनी जी चाल खेळली त्याचा फायदा झाल्याचं रोहितने म्हटले.


भारतानं महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कप 2007 मध्ये जिंकला होता. त्यानंतर रोहितच्या  नेतृत्त्वात भारताने ही कमाल करून दाखवली. दोन्ही वर्ल्ड कप खेळणारा रोहित हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. भारताला रोहित शर्माच्या नेतृत्त्वात एकदिवसीय सामन्यांच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये अंतिम फेरीत विजय मिळवण्यात अपयश आलं होतं. मात्र, 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं विजेतेपद मिळवलं. अंतिम फेरीत भारतानं सांघिक कामगिरीच्या जोरावर यश मिळवलं. 


इतर बातम्या :


Shivam Dube Ruled Out : कर्णधार सूर्याला मोठा धक्का; सामन्याच्या एक दिवस आधी शिवम दुबे टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला BCCIने दिली संधी


Women T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचा विजय अन् टीम इंडियाच्या आशांना मोठा धक्का! सेमीफायनलमधून बाहेर?