Women T20 World Cup 2024 Group A Points Table : महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. स्पर्धेतील पाचवा सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये कांगारूंनी 6 विकेट्सने सहज विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 7 गडी गमावून केवळ 93 धावा करू शकला. प्रत्युत्तराच्या डावात ऑस्ट्रेलियाने अवघ्या 15व्या षटकात हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे भारतीय संघाच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा विजय अन् टीम इंडियाच्या आशांना मोठा धक्का!
ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे टीम इंडियाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग आता कठीण झाला आहे. भारताला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून 58 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडियाला या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठायची असेल तर ऑस्ट्रेलियालाही हरवावे लागेल. याशिवाय टीम इंडियाला पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धचे उर्वरित दोन सामनेही जिंकावे लागणार आहेत. टीम इंडियासाठी प्रत्येक सामना करो या मरोचा असेल. जर भारत एक तरी सामना हरला तर सेमीफायनलमधून बाहेर होईल.
ऑस्ट्रेलियाच्या शानदार गोलंदाजीसमोर श्रीलंकेने पत्कारली शरणगती
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. अवघ्या 23 धावांवर श्रीलंकेने आपल्या तीन प्रमुख फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या होत्या. 20 धावांचा टप्पा ओलांडण्यात श्रीलंकेचे दोनच फलंदाज यशस्वी ठरले. निलाक्षी डी सिल्वा हिने (29) सर्वाधिक धावा केल्या. संपूर्ण षटक खेळल्यानंतर श्रीलंकेने 7 गडी गमावून 93 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी मेगन शुट ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 12 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला कोणतीही मोठी कसरत करावी लागली नाही. सलामीवीर बेथ मुनी एका टोकाला उभी राहिली, पण दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत राहिल्या. ॲलिसा हिली (4), एलिस पेरी (17) आणि ऍशले गार्डनर (12) यांनी निराशाजनक कामगिरी केली, पण बेथ मूनीच्या नाबाद 43 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 14.2 षटकांत 4 विकेट गमावून विजय मिळवला.
हे ही वाचा -
Ind vs Pak : चार महिन्यांपासून मिळाला नाही पगार, भारत-पाकिस्तान खेळाडूंच्या पगारात कितीचा फरक?