Rohit Sharma To BCCI Officials: काही दिवसांपूर्वीच वर्ल्डकप 2023 स्पर्धेची (ICC World Cup 2023) सांगता झाली. यंदा वर्ल्डकपचं (World Cup 2023) यजमानपद भारताकडे (India) होतं. अशातच संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियानं (Team India) धुवांधार कामगिरी केली. एकही सामना न गमावता टीम इंडियानं फायनल गाठली खरी, मात्र फायनलमध्येच प्रतिस्पर्धी कांगारूंनी टीम इंडियावर मोठ्या शिताफिनं मात केली. टीम इंडियाच्या हातचा घास हिरावत ऑस्ट्रेलियानं (Australia) वर्ल्डकप 2023 च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. वर्ल्डकप 2023 मधील टीम इंडियाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी नुकतीच बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत भविष्यातील कार्यक्रमांवरही चर्चा करण्यात आली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही (Rahul Dravid) या बैठकीसाठी उपस्थित होते. यादरम्यान रोहित शर्मानं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी पुढील टी-20 विश्वचषकात खेळण्याच्या शक्यतांबाबत स्पष्टपणे बातचित केल्याची माहिती मिळत आहे.
बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याचा हवाला देत एका वृत्तपत्रानं यासंदर्भात माहिती दिली आहे. वृत्तपत्रानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मानं बोर्ड सदस्यांना सांगितलं की, "तुम्हाला टी-20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup) माझी निवड करायची असेल, तर आत्ताच मला त्याबद्दल स्पष्ट सांगा."
टी20 विश्वचषकात टीम इंडियाचं कर्णधारपद रोहितकडेच?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बैठकीत उपस्थित असलेले सर्व अधिकारी, निवडकर्ते आणि प्रशिक्षक राहुल द्रविड टी-20 विश्वचषकाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यास एकमतानं इच्छुक असल्याचं दिसून आलं. रोहितनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपासूनच टीम इंडियाची धुरा सांभाळावी, अशी निवड समितीची इच्छा होती, पण रोहितनं काही दिवस विश्रांतीसाठी मागितले असल्याची माहिती मिळत आहे.
बीसीसीआयची ही रिव्ह्यू मिटींग नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, रोहित शर्मा या मिटींगमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहिला होता. दरम्यान, रोहित शर्मा सध्या लंडनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतोय. वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा सहकुटुंब लंडनला रवाना झाला होता.
हिटमॅन कसोटी मालिकेत दिसणार
रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आणि वनडे मालिकेत खेळणार नाही. मात्र, दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो थेट भारतीय क्रिकेट संघाची धुरा सांभाळणार आहे. रोहितनं ब्रेक घेण्याची विनंती केल्यामुळे निवडकर्त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे दिलं आहे. तर, केएल राहुल वनडे मालिकेची जबाबदारी सांभाळणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
टीम इंडियाकडून कधी खेळणार हार्दिक पांड्या? BCCIचा मेगाप्लान तयार, IPLचं काय?