Rohit Sharma On Virat Kohli: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (SA Vs IND) होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय एकदिवसीय संघाचं नेतृत्व करणार आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीनं हा निर्णय घेतलाय. रोहित शर्मा आता टी-20 आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल. तर, विराट कोहली (Virat Kohli) कसोटी संघाचं कर्णधारपद संभाळणार आहे. बीसीसीआयच्या (BCCI) या निर्णयावर आतापर्यंत क्रिकेट जगतातील सर्व दिग्गजांनी आपापली मतं व्यक्त केली आहेत. आता भारताचा नवा कर्णधार रोहित शर्मानं विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलंय. रोहित विराटबाबत नेमकं काय म्हणाला? हे जाणून घेऊयात.


एका शोमध्ये झालेल्या संभाषणादरम्यान रोहित शर्माने विराट कोहलीचे कौतुक केलंय. रोहित म्हणाला की, "विराट कोहलीचीआकडे पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की तो संघासाठी किती महत्त्वाचा खेळाडू आहे. तो अजूनही एक चांगला लीडर आहे. कोहलीला आपण कोणत्याही परिस्थितीत सोडू इच्छित नाही. तो अनुभवी खेळाडू आहे. त्यानं अनेकदा संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलीय".


विराट कोहलीनं आतापर्यंत 254 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यानं 59.07 च्या सरासरीनं 12 हजार 169 धावा केल्या आहेत. यात 43 शतक आणि 62 अर्धशतकाचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमधली त्याची सर्वोच्च धावसंख्या 183 धावा आहे. कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमधील जगातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-