Ashes 2021-22: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS Vs ENG) यांच्यात अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा (Gabba) मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज बेन स्टोक्सनं (Ben Stokes) पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वार्नरला (David Warner) क्लीन बोल्ड आऊट केलं. मात्र, तरीही त्याला जीवदान मिळालं. या सामन्यात नेमकं काय आणि आणि कुणाचं चुकलं? हे पाहण्यासाठी तुम्हाला खालील व्हिडिओ पाहावा लागणार आहे.
पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र संपूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या नावावर होते. पहिल्या दिवशी इंग्लंडला 147 धावांत गुंडाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियानं 1 बाद 113 धावा केल्या होत्या. मार्कस हॅरिस बाद झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन यांनी एकही विकेट पडू दिली नाही आणि संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. दरम्यान, बेन स्टोक्सनं डेव्हिड वार्नरला क्लीन बोल्ड केले. परंतु, टीव्ही रिप्लेमध्ये हा नो-बॉल असल्याचं दिसून आले आणि त्यामुळं वॉर्नरला 17 धावांवर जीवदान मिळालं.
ट्वीट-
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया- इंग्लंड यांच्यातील सामन्यापूर्वी प्रत्येक चेंडूवर नो बॉल तपासणाऱ्या प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. ज्यामुळं हा सामना जुन्या पद्धतीनं खेळला जात होता. त्यानुसार, फक्त तेच चेंडू तपासले जातात ज्यावर विकेट पडतात. मात्र, 2019 मध्ये आयसीसी या नियमात बदल केला. नव्या नियमानुसार प्रत्येक चेंडू नो-बॉल आहे की नाही? याची तपासणी केली जाते. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेदरम्यान प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये याची अंमलबजावणी करण्यात आली.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि माजी पंच सायमन टॉफेल यांनी याचा तीव्र निषेध केला आहे. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण संघ अवघ्या 147 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यजमान ऑस्ट्रेलियाचीही खराब सुरुवात झाली आणि मार्कस हॅरिस 11 धावा करून बाद झाला, पण त्यानंतर मार्नस लॅबुशेन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी मिळून संघाला मजबूत स्थितीत आणले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-