Rohit Sharma & Shubman Gill Viral Video : आज भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आशिया चषकाची फायनल होणार आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर फायनलचा थरार होणार आहे. या फायनलआधी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. दोघांमधील संभाषण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शुभमन गिल भारताचा कर्णधार रोहित शर्माला काहीतर म्हणत असल्याचे व्हिडीओतून दिसत आहे. गिल याचे म्हणणे रोहित शर्माला पटले नाही. रोहित शर्मा उत्तर देताना म्हणतो की, असे होऊ शकत नाही, पागल आहेस का ? रोहित शर्माला गिल याने असे काय विचारले की रोहित शर्मा असे म्हणाला... यावरुन चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होईल.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय शुभमन गिलने संतप्त झालेल्या रोहित शर्माने काय विचारले की, त्यावर चाहते सतत अंदाज लावत आहेत. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडीओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.
आज आशिया कप फायनलमध्ये रोहित शर्मा आणि शुभमन गिल एकत्रच फलंदाजीला मैदानात दिसणार आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील विजेतेपदाचा सामना कोलंबोमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सुपर-4 फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला. तर बांगलादेशविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंका संघाने सुपर-4 फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेशला पराभूत केले, परंतु भारतीय संघाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. अशाप्रकारे भारत आणि श्रीलंकेचे संघ प्रत्येकी ४ गुणांसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
पावसाचे सावट -
आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर लढत होणार आहे. ३० ऑगस्टपासून सुरु असणाऱ्या स्पर्धेचा विजेता आज रविवारी मिळणार आहे. अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे, फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. सुपर ४ फेरीत श्रीलंकेला हरवत भारताने फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनलचे तिकिट मिळवणारा भारत पहिला संघ ठरला होता. पाकिस्तानचा पराभव करत श्रीलंका संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता रविवारी आशिया चषकाचा किंग कोण? यावरुन पडदा उठणार आहे. भारत आणि श्रीलंका आशिया चषकाच्या फायनलमध्ये आठव्यांदा आमनेसामने आलेत. याआधी या दोन संघामध्ये सातवेळा स्पर्धा रंगली होती. रविवारी आशिया चषकाचा किंग कोण? यावरुन पडदा उठणार आहे. पण फायनलला जर पाऊस आला तर काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आशिया चषकाच्या फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण राखीब दिवशीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर फायनलचा सामना पावसामुळे धुतला गेला तर दोन्ही संघाना जेतेपद दिले जाईल.