IND vs SL: आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) च्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) सामना श्रीलंकेशी (Sri Lanka) होणार आहे. दोन्ही संघांमधील हा ब्लॉकबस्टर सामना आज (17 सप्टेंबर) कोलंबो येथे खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. या सामन्यात टीम इंडियाची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर असेल, तर दासून शनाका श्रीलंका संघाची कमान सांभाळेल. त्यामुळे आजच्या सामन्या कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


सामना खेळण्यासाठी मैदानात उतरताच रोहित रचणार रेकॉर्ड्स


आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा भारतीय कर्णधार रोहित शर्मावर खिळल्या आहेत. आशिया चषकाचा अंतिम सामना खेळण्यासाठी प्रवेश करताच रोहित एक मोठा विक्रम आपल्या नावावर करेल. रोहित एकूण पाचव्यांदा आशिया चषक फायनलमध्ये खेळणार आहे. या बाबतीत रोहित शर्मा मोहम्मद अझरुद्दीन, महेंद्रसिंह धोनी, नवज्योतसिंह सिद्धू आणि सचिन तेंडुलकर यांना देखील मागे टाकणार आहे. हे सर्व खेळाडू प्रत्येकी चार फायनल खेळले आहेत. 


एवढंच नाहीतर रोहित मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमापासून केवळ 33 धावा दूर आहे. आजच्या सामन्यात जर रोहितनं 33 धावा केल्या, तर तो आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरेल. रोहित सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करेल. एवढंच नाहीतर 61 धावा केल्यानंतर रोहित शर्मा आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये आपल्या एक हजार धावाही पूर्ण करेल. आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये 1000 धावा करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय क्रिकेटर ठरणार आहे. सचिन तेंडुलकरनं आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये 23 सामन्यांत 51.10 च्या सरासरीनं 971 धावा केल्या होत्या. तर रोहितनं आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळले असून 393 धावा केल्या आहेत. या काळात रोहितची सरासरी 46.95 राहिली आहे. रोहितनं अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावल्यास तो आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा कर्णधारही ठरेल. या बाबतीत रोहित अर्जुन रणतुंगा (6)ला मागे टाकेल.




रोहित शर्माचा 250 वा एकदिवसीय सामना


रोहित शर्माचा श्रीलंकेविरुद्धचा सामना हा त्याच्या कारकीर्दीतील 250 वा एकदिवसीय सामना असेल. त्यानं आतापर्यंत एकूण 249 एकदिवसीय सामने खेळले आहेत. सचिन तेंडुलकर (463), एमएस धोनी (347), राहुल द्रविड (340), मोहम्मद अझरुद्दीन (334), सौरव गांगुली (308), युवराज सिंह (301), विराट कोहली (279), अनिल कुंबळे (269) यांनी रोहित शर्मागून अधिक सामने खेळले आहेत. 


टीम इंडिया आठव्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज 


भारतीय क्रिकेट संघानं अंतिम सामना जिंकल्यास आठव्यांदा विजेतेपद पटकावणार आहे. आशिया कप (T20, ODI) च्या इतिहासात भारतीय संघानं सर्वाधिक 7 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. भारतानं 1984, 1988, 1990/91, 1995, 2010, 2016 आणि 2018 मध्ये आशिया चषक जिंकला. दुसऱ्या स्थानावर श्रीलंका आहे ज्यानं आतापर्यंत 6 वेळा आशिया चषक जिंकला आहे. श्रीलंकेच्या संघानं 1986, 1997, 2004, 2008, 2014 आणि 2022 मध्ये आशिया चषकाचं विजेतेपद पटकावलं आहे. तर 2000 आणि 2012 मध्ये आशिया चषक पाकिस्ताननं पटकावला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Asia Cup 2023 Final: आज मेगा फायनल, आशिया कपसाठी टीम इंडिया-श्रीलंका आज आमने-सामने, कोण घालणार विजयाला गवसणी?