एक्स्प्लोर

Rohit Sharma : रोहित शर्माला कसोटी कर्णधार पदावरुन हटवणार, एक्स्प्रेसचं एक्सक्लुझिव्ह वृत्त

Rohit Sharma : आयपीएल संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका खेळेल.

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ (Team India) आयपीएलनंतर (IPL) इंग्लंडच्या दौऱ्यावर (England Tour) जाणार आहे. इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका (Test Series) खेळणार आहे. राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यांनी रोहित शर्माला (Rohit Sharma) कसोटी संघाच्या कर्णधार पदावरुन दूर करण्यचा निर्णय घेतल्याचं वृत्त द इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे.  रोहित शर्माला कसोटी संघात सलामीवीर म्हणून स्थान दिलं जाईल. बीसीसीआयचा देखील निवड समितीच्या सदस्यांच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचं वृत्त आहे. 


रोहित शर्मानं गेल्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवून दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी पाहता हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. यामुळं रोहित शर्माकडे एकदिवसीय संघाचं नेतृत्व राहू  शकतं.रोहित शर्मा यापुढं वनडे क्रिकेटला प्राधान्य देऊ शकतो, असं समजतंय. 

रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयानंतर इंग्लंड दौऱ्यात नेतृत्व करेल अशी बीसीसीआयचा प्राथमिक अंदाज होता. रोहित शर्मानं मायकल क्लार्कला दिलेल्या मुलाखतीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्यासह इंग्लंडवर आक्रमण करण्यास उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. मात्र, गेल्या महिन्यात निवड समितीच्या सदस्यांनी रोहित शर्माच्या भारतीय कसोटी संघातील स्थानावर चर्चा केली. 

निवड समितीचे विचार स्पष्ट असून, इंग्लड दौऱ्यासाठी त्यांना नवा कर्णधार हवा आहे, रोहित शर्मा कर्णधार म्हणून रेड बॉल क्रिकेट म्हणजेच कसोटीत नेतृत्व करण्यास फिट नसल्याचं निवड समितीचं मत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढच्या राऊंडसाठी निवड समितीचा विचार नव्या नेतृत्त्वाला विकसित करणं हा आहे. निवड समितीनं रोहितनं संघाचं नेतृत्व करु नये असं बीसीसीआयला कळवल्याची माहिती बोर्डातील सूत्रानं दिल्याचं एक्स्प्रेसनं छापलं आहे. 

निवड समितीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जी  अस्थिरता दिसून आली होती ती नको आहे. रोहित शर्माला त्या मालिकेत संघर्ष करावा लागला होता.पाच डावांमध्ये त्यानं 6.20 च्या सरासरीनं फलंदाजी केली होती. शेवटच्या कसोटीत रोहित शर्मा स्वत: संघाबाहेर बसला होता. याशिवाय न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत  रोहित शर्मानं तीन कसोटी सामन्यांमध्ये 15.16 च्या सरासरीनं धावा केल्या होत्या.

कसोटी क्रिकेटमधील रोहित शर्माच्या फॉर्ममुळं निवड समिती त्याला कर्णधार करण्याच्या निर्णयाच्या बाजूनं दिसत नाही. रोहित शर्माला फलंदाज म्हणून संघात स्थान दिल्यास आणि त्याची कामगिरी चांगली न झाल्यास वगळता येईल. मात्र,तो कर्णधार असल्यास गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण होतो. याचा टीमवर देखील विपरीत परिणाम होतो, अशी भूमिका निवड समितीची आहे. 

रोहितनं 67 कसोटी सामन्यात 40.57 च्या सरासरीनं फलंदाजी केली आहे. मात्र, विदेशात त्याची सरासरी 31.01 वर येते. ऑस्ट्रेलियात 24.38, दक्षिण आफ्रिकेत 16.63  इतकी आहे. तर, इंग्लंडमध्ये त्याची सरासरी 44.66 इतकी आहे. सलामीवीर म्हणून त्याची इंग्लंडमधील सरासरी 44.44 इतकी आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG 4th T20I : भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी-20 सामना आज! हाय-व्होल्टेज ड्रामा, सस्पेन्स अन् बरंच काही... खिसा रिकामा न करता Live मॅचचा आनंद कुठे घ्यायचा? वाचा एका क्लिकवर
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी-20 सामना आज! हाय-व्होल्टेज ड्रामा, सस्पेन्स अन् बरंच काही... खिसा रिकामा न करता Live मॅचचा आनंद कुठे घ्यायचा? वाचा एका क्लिकवर
IND vs ENG 4th T20 Playing 11 : संजू सॅमसन IN, उपकर्णधार OUT?, इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing 11
संजू सॅमसन IN, उपकर्णधार OUT?, इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing 11
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
आधी कर्णधारपद गेलं, मग संघातून डच्चू; आता ICC रँकिंगच्या टॉप-10 मधून सूर्यकुमार यादव OUT, टीम इंडिला धू-धू धुणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूची मोठी झेप
आधी कर्णधारपद गेलं, मग संघातून डच्चू; आता ICC रँकिंगच्या टॉप-10 मधून सूर्यकुमार यादव OUT, टीम इंडिला धू-धू धुणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूची मोठी झेप

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Omraje Nimbalkar: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
Sairat Fame Actor Arbaaz Sheikh Tukaram Munde Action: FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
Trinamool Congress: सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Embed widget