Rohit Sharma BCCI Meeting : बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर संघावर खुप टीका झाली. विशेषतः भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांना ट्रोलर्सनी टार्गेट केले. त्यानंतर 11 जानेवारी रोजी मुंबईत एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. जिथे बीसीसीआयने कर्णधार आणि प्रशिक्षकांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. जिथे रोहितने त्याच्या कर्णधारपदाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


खरंतर, बीसीसीआयसोबतच्या बैठकीत बीसीसीआयने प्रशिक्षक गंभीर आणि कर्णधार रोहित यांना बीजीटीमधील खराब कामगिरीबद्दल अनेक प्रश्न विचारले. त्यानंतर रोहितनेही कर्णधारपदाबद्दल आपले मत मांडले आहे. जर वृत्तांवर विश्वास ठेवायचा असेल तर, त्याने स्पष्ट केले आहे की तो, पुढील दोन-तीन महिन्यांसाठीच कर्णधार असेल, तोपर्यंत बीसीसीआय भविष्यासाठी पर्याय शोधावा.


रोहित शर्माच्या या निर्णयामुळे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तो टीम इंडियाचा कर्णधार असेल हे स्पष्ट झाले आहे. तसेच हे स्पष्ट आहे की रोहित शर्मा बराच काळ टीम इंडियासोबत नाही. अशा परिस्थितीत, आता रोहितनंतर भारताचे नेतृत्व कोण करणार हा चर्चेचा विषय आहे.


टीम इंडियाचा नवा कॅप्टन कोण? 


त्याचबरोबर, अहवालांमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, जसप्रीत बुमराहला कसोटी संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते. पण, या विचारादरम्यान, प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न देखील आला आहे की, तो इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील प्रत्येक सामना खेळण्यास सक्षम आहे की नाही. कारण नुकत्याच खेळलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये तो सर्व सामने खेळला होता, पण शेवटच्या सामन्यात त्याला दुखापत झाली. त्यामुळे आता त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणे कठीण झाले आहे.




ऑस्ट्रेलियात भारताचा लाजिरवाणा पराभव


बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1-3 असा पराभव पत्करावा लागला होता. या मालिकेत भारताने फक्त पहिला सामना जिंकला होता, जो बुमराहच्या नेतृत्वाखाली पर्थमध्ये खेळला गेला होता. शेवटच्या सामन्यात बुमराह कर्णधार होता, पण संघ तिथे जिंकण्यात अपयशी ठरला. कारण तेव्हा तो दुखापतग्रस्त झाला होता आणि मैदानाबाहेर गेला, त्यावेळी विराट कोहलीने संघाची धुरा सांभाळली.


हे ही वाचा -


Ind vs Eng T20 Squad : धोनीच्या लाडक्याला BCCIने पुन्हा डावललं! मराठमोळ्या CSK कॅप्टनला वगळण्यामागं मोठं राजकारण? चाहत्यांचा संताप