एक्स्प्लोर

Rohit Sharma ICC ODI Rankings Update : भारत अन् दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेआधी रोहित शर्माला मोठा धक्का; वनडे रँकिंगमध्ये घसरण, कुठल्या स्थानी गेला?

Rohit Sharma loses top spot in ODI rankings Marathi News : तीन आठवडे आयसीसीच्या एकदिवसीय वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान राखल्यानंतर हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा खाली घसरला आहे.

ICC ODI Rankings Rohit Sharma Update : 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत–दक्षिण आफ्रिका वनडे (India vs South Africa ODI) मालिकेच्या अगोदर टीम इंडियासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तीन आठवडे आयसीसीच्या एकदिवसीय वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI Rankings) अव्वल स्थान राखल्यानंतर हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा खाली घसरला आहे. हिटमॅन आता दुसऱ्या स्थानावर घसरला असून त्याची जागा न्यूझीलंडच्या तुफानी फलंदाज डेरिल मिचेलने (Daryl Mitchell) घेतली आहे. मिचेल 782 गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे, तर रोहितकडे 781 गुण असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मिचेलची तुफानी खेळी अन् ऐतिहासिक कामगिरी....

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या वनडेत मिचेलने आपल्या कारकिर्दीतील सातवे शतक ठोकले. 118 चेंडूत 119 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह त्याने न्यूझीलंडला 7 धावांनी विजय मिळवून दिला. या शतकी खेळीमुळेच त्याने रँकिंगमध्ये झेप घेतली. विशेष म्हणजे, दुसऱ्या वनडेत त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. मिचेल हा वनडे रँकिंगमध्ये नंबर वनवर पोहोचणारा न्यूझीलंडचा फक्त दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 1979 मध्ये ग्लेन टर्नर हा यादीत पहिल्या स्थानावर पोहोचला होता.

रोहितकडे पुन्हा नंबर वन होण्याची सुवर्णसंधी (Rohit Sharma loses top spot in ODI rankings)

रोहित आणि मिचेल यांच्यात फक्त 1 गुणाचा फरक आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दाखवलेला फॉर्म कायम ठेवला, तर तो पुन्हा नंबर वनची गादी सहज पुन्हा मिळवू शकतो.

टॉप-10 मध्ये भारताची पकड कायम

टॉप-10 यादीत अजूनही भारतीय वर्चस्व दिसते आहे, कारण रोहितशिवाय, इतर तीन भारतीय फलंदाज टॉप 10 मध्ये आहेत. शुभमन गिल चौथ्या, विराट कोहली पाचव्या आणि श्रेयस अय्यर आठव्या स्थानावर आहेत. भारताचे चार प्रमुख खेळाडू टॉप-10 मध्ये असल्याने टीम इंडियाची मजबूत उपस्थिती कायम असल्याचे स्पष्ट होते.

टी20 अन् कसोटीत भारतीय खेळाडू अव्वल स्थान कायम

गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचे टी-20 मध्ये वर्चस्व या आठवड्यातही कायम राहिले. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटीत अव्वल स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा रशीद खान एकदिवसीय सामन्यात अव्वल स्थानावर आहे.

पाकिस्तानी फलंदाजांचाही फायदा...

श्रीलंका–पाकिस्तान मालिकेनंतर पाकिस्तानी खेळाडूंचीही रँकिंग सुधारली आहे. मोहम्मद रिजवान पाच स्थानांची उडी घेत 22व्या स्थानी आला आहे, तर फखर जमान 26व्या स्थानी पोहोचला आहे.

हे ही वाचा -

Ranji Trophy 2025-26 Manipur Lamabam Singh OUT : ना कॅच, ना स्टम्पिंग, ना रनआऊट, तरीही फलंदाज OUT! सगळेच चक्रावले; रणजी ट्रॉफीमध्ये नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Prithviraj Chavan: सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?
Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Prithviraj Chavan: सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Election Commission: राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची खमकी भूमिका
राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची खमकी भूमिका
Pannalal Surana Passed Away : दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Election: कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
Embed widget