Rohit Sharma: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात मिळालीय. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघानं बांगलादेशविरुद्ध मोहाली येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. पहिल्या कसोटी सामन्यानंतर रोहितनं अलीकडंच बीसीसीआयला एक मुलाखत दिली. ज्यात तो भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार होईल असं स्वप्नातही त्याला वाटलं नव्हतं, असं त्यानं मुलाखतीत म्हटलंय. 


रोहितने बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हणाला की, "भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणं आणि या यादीचा एक भाग बनणं माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, मी तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार होईल" श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी रोहितला भारताचा 35वा कसोटी कर्णधार बनवण्यात आलं. भारत श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना येत्या 12 मार्चपासून खेळला जाणार आहे. हा सामना डे-नाईट असणार आहे. 


कर्णधारपदासोबतच हिटमॅन रोहितनेही आपल्या निर्णयांनी चाहत्यांची मनं जिंकली. मोहाली कसोटी हा विराट कोहलीच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना होता. या सामन्यात त्याने 45 धावा केल्या. कोहलीचा ऐतिहासिक सामना अधिक खास बनवण्यासाठी रोहितनं विराटला गार्ड ऑफ ऑनर देण्याचा निर्णय घेतला. कोहलीला गार्ड ऑफ ऑनर दिल्यानंतर रोहित म्हणाली की "आम्ही या फॉरमेटमध्ये ज्या ठिकाणी आहोत, त्याचं श्रेय विराटला जाते."


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha