Ind vs Aus 1st Test : ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत येणार ट्विस्ट?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
Rohit Sharma Continues To Train in Mumbai : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडूंनीही सराव सुरू केला आहे. पण भारतीय कर्णधार सध्या संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेलेला नाही. तो या मालिकेतील सलामीच्या सामन्याचा भाग बनू शकेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या महत्त्वाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्माने मोठा निर्णय घेतला आहे.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, रोहित शर्माने ऑस्ट्रेलियात आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी मुंबईत राहून प्रशिक्षण सुरू केले आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 13 नोव्हेंबरला मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्ये सराव करताना दिसला. ऑस्ट्रेलियाला गेला नाही तरीही रोहितने सराव सोडला नाही आणि त्याला लवकरात लवकर ऑस्ट्रेलियात आपल्या संघात सामील व्हायचे आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत मोठा ट्विस्ट हा येऊ शकतो की, रोहित सामन्याच्या एक दिवस आधी पण ऑस्ट्रेलियात जाऊ शकतो, पण त्याच्या ऑस्ट्रेलियाला जाण्याबाबत अद्याप कोणतीही अपडेट आली नाही.
टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर संघात ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहे. पहिला गट 10 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. यानंतर 11 नोव्हेंबरला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही अनेक खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. आता रोहित शर्मा वगळता इतर खेळाडू पर्थच्या मैदानात जोरदार सराव करत आहेत. तर टीम इंडिया या मैदानावर 22 नोव्हेंबरला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे.
पण रोहित शर्मा केवळ पर्थ कसोटीच नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ॲडलेड कसोटीही खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रोहित शर्मा यांनी रोहितच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट केले होते. बुमराह कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. अशा परिस्थितीत, नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत, उपकर्णधार संघाचे नेतृत्व करतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन - केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (कर्णधार) आणि प्रसिद्ध कृष्णा.
हे ही वाचा -
ICC Champions Trophy 2025 : नवा ट्विस्ट! PCBच्या पायाखालची सरकणार जमीन; पाकिस्तानात नाही... 'या' देशात होणार चॅम्पियन्स ट्रॉफी?