ENG vs IND 2nd T20 : भारतीय संघ सध्या रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळत असून सध्या दुसरा टी20 सामना सुरु आहे. बर्मिंगहमच्या एजबेस्टन मैदानात पार पडणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने (Rohit Sharma) एक खास रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. केवळ 31 धावा केल्या असतानाही त्याने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. टी20 क्रिकेटमध्ये 300 चौकार मारणारा रोहित पहिला भारतीय ठरला आहे.


सामन्यात रोहितने सलामीला येत 31 धावांची तुफान खेळी केली. यावेळी त्याने 20 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार झळकावत ही कामगिरी केली. याच चौकारांच्या मदतीने त्याने टी20 क्रिकेटमध्ये 300 चौकार पूर्ण केले आहेत. भारताकडून अद्याप कोणीच ही कामगिरी केली नसल्याने हा रेकॉर्ड करणारा रोहित पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. 


उत्तम टी-20 संघाचा उत्कृष्ट कर्णधार


दरम्यान, मागील टी-20 विश्वचषकानंतर (T20 World Cup) भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) भारतीय टी-20 संघाचा राजीनामा दिला. त्यानंतर रोहित शर्माकडं भारतीय टी-20 संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. रोहित शर्मानं कर्णधार म्हणून आतापर्यंत 13 टी-20 सामने खेळले आहेत. भारतीय संघाचं नेतृत्व करताना त्यानं बांग्लादेशविरुद्ध 2, न्यूझीलंडविरुद्ध 4, वेस्ट इंडीजविरुद्ध 3, श्रीलंकाविरुद्ध 3 आणि इंग्लंड एक टी-20 सामना जिंकला आहे. रोहितच्या नेतृत्वात भारतीय टी-20 संघानं सलग तीन मालिकेत विरोधी संघाला क्लीन स्वीप दिलं आहे. ज्यात न्यूझीलंड, वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेचा समावेश आहे. 


हे देखील वाचा-