Team India Celebrating Bakri Eid : भारत आणि इंग्लंड (England vs India) यांच्यात दुसरा टी20 सामना खेळवला जात आहे. दरम्यान दुसरीकडे जगभरात बकरी ईदचा (Bakri Eid 2022) उत्साह असून भारतीय क्रिकेटपटूंनीही बकरी ईदनिमित्त खास फोटोशूट केलं आहे. सध्या इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेट संघ असून टी20 मालिका सुरु आहे. आजच्या सामन्यात संघात नसणाऱ्या उमरान मलिक (Umran Malik), मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि आवेश खान (Avesh Khan) या तिघांनीही बकरी ईद निमित्ताने खास पारंपरिक पोशाख घालत काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.


आवेश, सिराज आणि उमरान या तिघांनीही आपआपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटोज पोस्ट केले असून यामध्ये ते मुस्लिम बांधवाच्या पारंपरिक पोशाखात दिसत आहेत. तिघांनीही आपआपले सिंगल फोटोज तसेच तिघेही एकत्र असणारे फोटोजही पोस्ट केले आहेत. कॅप्शनमध्ये त्यांनी बकरी ईदच्या शुभेच्छा आवर्जून दिल्या आहेत. या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स येत असून भारतीय क्रिकेटचाहते आपल्या लाडक्या क्रिकेटर्सना ईदच्या शुभेच्छा देत आहेत. 






 






कशी आहे दोन्ही संघाची अंतिम 11?


आज होणाऱ्या सामन्यात इंग्लंडने संघात दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यांनी डेविड विली आणि गेसन रिचर्ज ग्लेसन यांना संघात घेत, टायमन मिल्स आणि टोप्ले यांना विश्रांती दिली आहे. दुसरीकडे भारतीय संघानेही चार बदल केले आहेत. यावेळी भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराह संघात परतले आहेत.  तर नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी आहे, यावर एक नजर फिरवूया... 


भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्‍वर कुमार, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह


इंग्लंडचा संघ : जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार), डेविड मलान, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ​​​हॅरी ब्रुक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, डेविड विली, मॅथ्यू पार्किंसन आणि रिचर्ड ग्लीसन


हे देखील वाचा-