IND vs ENG Edgbaston T20 : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान भारताने प्रथम फलंदाजीला येत चांगली सुरुवातही केली. पंत-शर्मा जोडीने तुफान फटकेबाजीने सुरुवात केली. पण दोघेही बाद झाल्यावर मात्र भारताचा डाव गडबडला. पण अनुभवी जाडेजाने नाबाद 46 धावा करत भारताची धावसंख्या 170 पर्यंत नेली. ज्यामुळे आता इंग्लंडसमोर 171 धावांते लक्ष्य आहे
इंग्लंडमधील बर्मिंगहमच्या एजबेस्टन (Edgbaston) मैदानात पार पडणाऱ्या या सामन्यात आधी दमदार फलंदाजी आणि नंतर भेदक गोलंदाजीचं दर्शन खेळाडूंनी घडवलं. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर सलामीला भारताकडून रोहित शर्मा आणि ऋषभ पंत जोडी आली. दोघांनीही दमदार खेळीला सुरुवात केली. पण इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या रिचर्ड ग्लीसनने रोहितला 31 धावांवर तंबूत धाडलं. ज्यानंतर पंत (26) आणि कोहली (1) यांना एकाच षटकात ग्लीसननेच माघारी धाडलं. ज्यानंतर भारतीय फलंदाज एका मागे एक बाद होऊ लागले. पण रवींद्र जाडेजाने अनुभवाची कमाल दाखवत 29 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 46 धावा केल्या. ज्यामुळे भारतीय संघाने 171 धावांचे आव्हान इंग्लंडला दिले आहे. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक 4 तर रिचर्ड ग्लीसनने 3 विकेट्स घेतल्या.
रोहित शर्माचा खास रेकॉर्ड
या सामन्यात संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने (Rohit Sharma) एक खास रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. केवळ 31 धावा केल्या असतानाही त्याने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. टी20 क्रिकेटमध्ये 300 चौकार मारणारा रोहित पहिला भारतीय ठरला आहे. सामन्यात रोहितने सलामीला येत 31 धावांची तुफान खेळी केली. यावेळी त्याने 20 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार झळकावत ही कामगिरी केली. याच चौकारांच्या मदतीने त्याने टी20 क्रिकेटमध्ये 300 चौकार पूर्ण केले आहेत. भारताकडून अद्याप कोणीच ही कामगिरी केली नसल्याने हा रेकॉर्ड करणारा रोहित पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
हे देखील वाचा-
- ENG vs IND, 2nd T20, Toss Update : भारतीय संघात चार महत्त्वाचे बदल, कोहली सलामीला येणार, इंग्लंडने नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी
- Watch : हॉकी विश्वचषक सामन्यादरम्यान महिला खेळाडूची बॉयफ्रेंडला किस, भर मैदानात केलं प्रपोज, पाहा VIDEO
- India Tour Of Zimbabwe: वेस्ट इंडीजनंतर भारताचा झिम्बॉवे दौरा; कधी, कुठे रंगणार सामने? येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक