Asia Cup 2022, Rohit Sharma, Virat Kohli : आशिया चषक 2022 (2022 Asia Cup) स्पर्धेला 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. आशिया खंडातील ही सर्वात मोठी क्रिकेट टूर्नामेंट असल्याने सर्व संघ आपले टॉप खेळाडू घेऊन संघ उतरवणार आहेत. अशामध्ये भारतानेही आपला संघ जाहिर केला असून भारताचं कर्णधारपद रोहित शर्माकडे तर उपकर्णधारपद केएल राहुलकडे असणार आहे. दरम्यान कर्णधार म्हणून मैदानात रोहित उतरताना त्याच्याकडे माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) एक मोठा रेकॉर्ड तोडण्याची सुवर्णसंधी आहे. कर्णधार म्हणून कोहलीपेक्षा अधिक विजय भारतीय संघाला मिळवून देण्याची ही संधी रोहितकडे आहे.

आतापर्यंत भारताने सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय सामने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्त्वाखाली जिंकले आहेत. 41 सामने भारतानो धोनी कर्णधार असताना जिंकले असून विराट कोहली कर्णधार असताना भारताने 30 सामने जिंकले आहेत. तर रोहित शर्मा कर्णधार झाल्यापासून भारत 29 आंतरराष्ट्रीय टी20 सामने जिंकला आहे. त्यामुळे रोहितने आणखी दोन सामन्यात भारताला विजय मिळवून दिल्यास तो विराटचा रेकॉर्ड मोडणार आहे.    

कोहलीकडेही अनोखं शतक करण्याची संधी

खराब फॉर्ममुळे मागील काही काळ टीकाचा धनी झालेला विराट संघात असून त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची सर्वजण अपेक्षा करत आहेत. अशामध्ये विराट कोहली स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच एक अनोखा रेकॉर्ड नावे करणार आहे. विराटचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना असणार असून विशेष म्हणजे रोहित शर्मानंतर 100 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळणारा तो पहिला भारतीय असेल.

यंदा आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे पाच देश एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. यावेळी भारताचा स्पर्धेतील पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने युएईमध्ये होणार असून दुबई, शारजाह या मैदानात सामने रंगतील. 11 सप्टेंबर रोजी अंति सामना पार पडणार असून नेमकं वेळापत्रक कसं आहे पाहूया...

सामनादिवसदिनांकसंघग्रुप ठिकाण 
1शनिवार27 ऑगस्टअफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंकाबीदुबई
2रविवार28 ऑगस्टभारत विरुद्ध पाकिस्तानदुबई
3मंगळवार30 ऑगस्टबांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान बीशारजाह
4बुधवार31 ऑगस्टभारत विरुद्ध पात्र संघदुबई
5गुरुवार1 सप्टेंबरश्रीलंका विरुद्ध बांग्लादेश बीदुबई
6शुक्रवार2 सप्टेंबरपाकिस्तान विरुद्ध पात्र संघशारजाह
7शनिवार3 सप्टेंबरग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2सुपर 4शारजाह
8रविवार4 सप्टेंबरग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2सुपर 4दुबई
9मंगळवार6 सप्टेंबरग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1सुपर 4दुबई
10बुधवार7 सप्टेंबरग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2सुपर 4दुबई
11गुरुवार8 सप्टेंबरग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2सुपर 4दुबई
12शुक्रवार9 सप्टेंबरग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2सुपर 4दुबई
13रविवार11 सप्टेंबरसुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2सुपर 4दुबई

हे देखील वाचा-