Virat Kohli in Asia Cup 2022 : आशिया चषकासाठी (Asia Cup) भारतीय संघ सज्ज झाला असून भारताने आपला 15 सदस्यीय संघही जाहीर केला आहे. आता नेमकी अंतिम 11 कशी असणार याची चर्चा सुरु असताना भारताने यावेळी सलामीला रोहित शर्मासोबत विराट कोहलीला पाठवावं असा सल्ला भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल (Parthiv Patel) याने दिला आहे. 


माजी भारतीय क्रिकेटर पार्थिव पटेलने विराट कोहलीबाबत वक्तव्य करताना विराट कोहलीला टीम इंडियामधून आशिया कपच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासोबत भारताच्या डावाची सुरुवात केली पाहिजे, असा सल्ला दिला आहे. यामुळे विराटला त्याच्याप्रमाणे खेळण्याची संधी मिळेल, ज्याचा फायदा त्याला आणि संघाला देखील होईल. तो विश्रांतीवरुन परत येत असून त्याला शून्यापासून सुरुवात करण्यासाठी ओपनिंग महत्त्वाची आहे, तसंच सलामीला येताना त्याचा स्ट्राईक रेटही चांगला असू शकतो, असंही पार्थिव म्हणाला आहे. 


आयपीएलमध्ये सलामीचा रेकॉर्ड दमदार


आयपीएलमध्ये विराट कोहली सलामीला खेळला असून त्याचा या दरम्यानचा रेकॉर्ड शानदार आहे. विराट कोहलीने आयपीएलमधील 84 डावांत ओपनिंग करताना 41.86 च्या शानदार सरासरीने आणि 134.54 च्या दमदार स्ट्राईक रेटने 2 हजार 972 रन केले आहेत. त्याने ओपनिंग करताना 20 अर्धशतकं आणि 5 शतकं ठोकली आहेत.


कसा आहे भारतीय संघ?


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान. 


राखीव - दीपक चाहर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल






हे देखील वाचा-