India Vs England : रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताचा कर्णधार झाल्यापासून कर्णधार म्हणून त्याने दमदार कामगिरी सुरुच ठेवली आहे. एक-दोन नाही तर तब्बल 19 सामने जिंकत रोहितने आपला विजयी रथ कायम ठेवला आहे. ज्यामुळे आज रोहित शर्माकडे ऑस्ट्रेलियाचा महान माजी कर्णधार रिकी पॉटिंगच्या एका खास रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे. भारताने आजचा सामना जिंकल्यास कर्णधार म्हणून रोहितचा हा तिन्ही क्रिकेट प्रकारातील हा सलग 20 वा विजय असेल. याआधी रिकी पॉटिंग याने तिन्ही क्रिकेट प्रकारात मिळून सलग 20 विजय मिळवले होते. ज्यानंतर आता रोहित आजच्या विजयासह या रेकॉर्डशी बरोबरी करु शकतो.  


विराच कोहलीनंतर भारताचा पूर्ण वेळ कर्णधार झालेल्या रोहित शर्माने आतापर्यत एका मागे एक विजय मिळवले आहेत. त्याने टीम इंडियाला सलग 19 विजय मिळवून दिले आहेत. याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने सलग 20 सामने जिंकत एक रेकॉर्ड सेट केला आहे. आज रोहित या रेकॉर्डची बरोबरी करु शकतो. 


रोहित शर्माकडून दमदार नेतृत्त्व


मागील वर्षी टी-20 विश्वचषकानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं भारतीय टी-20 संघाचा राजीनामा दिला. त्यानंतर रोहित शर्माकडं भारतीय टी-20 संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. रोहित शर्मानं कर्णधार म्हणून आतापर्यंत एकूण 14 टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने जिंकले आहेत. यामध्ये टी20 सामन्यांचा विचार करता बांग्लादेशविरुद्ध 2, न्यूझीलंडविरुद्ध 4, वेस्ट इंडीजविरुद्ध 3, श्रीलंकाविरुद्ध 3 आणि इंग्लंडविरुद्ध दोन टी-20 सामने जिंकले आहेत. दरम्यान आज होणारा इंग्लंडविरुद्धचा टी20 सामना जिंकताच विराट 15 वा सलग टी20 सामना तर तिन्ही क्रिकेटप्रकारातील सलग 20 वा विजय कर्णधार म्हणून नावे करेल. 


हे देखील वाचा-