Rohit sharma : हिटमॅन झाला षटकारांचा बादशाह, ख्रिस गेलचा विक्रम मोडला
Rohit sharma, World Cup : हिटमॅन रोहित शर्माने आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Rohit sharma, World Cup : हिटमॅन रोहित शर्माने आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. रोहित शर्माने युनविर्स बॉसचा विक्रम मोडला आहे. रोहित शर्मान 473 डावात 555 षटकारांचा विक्रम केला आहे.
सर्वाधिक षटकारांचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर -
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रम रोहित शर्माने केला आहे. अफगाणिस्तानविरोधात तिसरा षटकार मारताच रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज झाला आहे. रोहित शर्माच्या नावावर सध्या 555 षटकारांची नोंद झाली आहे. रोहित शर्माने 473 आंतरराष्ट्रीय डावात 555 षटकार मारले आहेत. रोहित शर्माने युनिवर्स बॉसचा विक्रम मोडीत काढला आहे. ख्रिस गेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 553 षटकार ठोकले आहेत.
Most sixes in International cricket:
— Johns. (@CricCrazyJohns) October 11, 2023
Rohit Sharma - 554* (473 innings)
Chris Gayle - 553 (551 innings) pic.twitter.com/Jjnwf2fMQP
वर्ल्ड कपमध्ये एक हजार धावा -
रोहित शर्माने विश्वचषकातील एक हजार धावांचा टप्पा पार केला आहे. 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात रोहित शर्माने खोऱ्याने धावा काढल्या होत्या. रोहित शर्माने विश्वचषकाच्या 19 व्या सामन्यात एक हजार धावांचा पल्ला पार केला. विराट कोहलीच्या आधी तीन भारतीयांनी हा पराक्रम केला आहे. सचिन तेंडुलकर , विराट कोहली आणि सौरव गांगुली यांनी याआधी विश्वचषकात भारतासाठी एक हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
BCCI's special poster for Rohit Sharma.
— Johns. (@CricCrazyJohns) October 11, 2023
- Captain, Leader, Legend, Hitman. pic.twitter.com/s9713rb5KK
रोहित शर्माचे आक्रमक रुप -
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माला मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा गोल्डन डकचा शिकार झाला. शून्यावर बाद झाल्यानंतर रोहित शर्मावर टीकास्त्र सोडण्यात आले होते. अफगाणिस्तानविरोधात रोहित शर्माने वादळी फलंदाजी केली. 270 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ईशान किशनच्या साथीने रोहित शर्माने आक्रमक सुरुवात केली. पहिल्या 10 षटकात भारताने बिनबाद 90 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. रोहित शर्माने पहिल्या चेंडूपासून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. रोहित शर्माने 44 चेंडूमध्ये 77 धावांची खेळी केली आहे. यामध्ये चार षटकार आणि 8 चौकारांचा समावेश आहे. रोहित शर्माने 30 चेंडूत अर्धशतक ठोकले. रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीसमोर अफगाण गोलंदाजांची दाणादाण उडाली होती. एकाही गोलंदाजाला अचूक टप्प्यावर मारा करता आला नाही. दिल्लीच्या सपाट खेळपट्टीवर रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत भारताची धावसंख्या वाढवली.