Rohit Sharma's Record Team India : नागपूर येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केल्यानंतर भारतीय संघ कसोटीत पहिल्या क्रमांकावर पोहचला. बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने दुसऱ्या क्रमांकावरुन पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघ सध्या पहिल्या स्थानावर आहे. वनडे, टी 20 आणि कसोटीमध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर पोहचल्यानंतर रोहित शर्माच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद झाली.  


क्रिकेट इतिहासातील पहिला कर्णधार -


रोहित शर्मा भारतीय टीमच्या तिन्ही फॉर्मेटमधील नियमीत कर्णधार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे.  रोहित शर्मा क्रिकेट इतिहासातील पहिलाच कर्णधार झालाय, त्यानं आपल्या नेतृत्वात संघाला तिन्ही फॉर्मेटमध्ये एकाच वेळी नंबर 1 केलेय. टीम इंडिया सध्या कसोटीत  115 रेटिंग आणि 3690 पॉइंट्स, वनडे मध्ये 114 रेटिंग आणि 5010 पॉइंट्स तसेच टी20 मध्ये 267 रेटिंग आणि 18,445 पॉइंट्स सह पहिल्या क्रमांकावर आहे. 


टेस्ट क्रिकेटमध्ये आठव्या स्थानावर पोहचला रोहित - 


बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी केली होती. 120 धावांच्या खेळीचा फायदा रोहित शर्माला कसोटी क्रमवारीत झाला आहे. रोहित शर्माने नवव्या क्रमांकावरुन आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. नागपूर कसोटी रोहित शर्माने 15 चौकार आणि 2 षटकारांसह 120 धावांची खेळी केली होती. रोहित शर्मा सध्या 786 रेटिंगसह आठव्या स्थानावर आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 46 कसोटी सामन्यातील 78 डावात   47.20 च्या सरासरीने 3257 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 9 शतके आणि 14 अर्धशतके झळकावली आहेत. 


आयसीसी रँकिंगमध्ये भारताचाच दबदबा -


टीम इडिया कसोटीत नंबर 1  


वनडे मध्ये टीम इंडिया नंबर 1


टी 20 मध्ये नंबर 1 टीम इंडिया


टी 20 मध्ये अव्वल फलंदाज - सूर्यकुमार यादव


वनडेतील नंबर 1 गोलंदाज - मोहम्मद सिराज


कसोटीतील नंबर 1 अष्टपैलू - रविंद्र जाडेजा


कसोटीतील नंबर 2 अष्टपैलू खेळाडू - आर अश्विन


कसोटीती नंबर 2 गोलंदाज - आर अश्विन 


टी 20 तील नंबर 2 अष्टपैलू - हार्दिक पांड्या






आणखी वाचा :
ICC Rankings : ऐतिहासिक! वनडे, टी20 नंतर कसोटीतही टीम इंडिया नंबर 1