Indian Team and Player's ICC Rankings : भारतीय संघासाठी आणि खेळाडूंसाठी 2023 वर्षाची सुरुवात एकदम खास झाली आहे.  2022 मधील अपयशाला विसरुन टीम इंडियानं दणक्यात सुरुवात केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाने अनेक मोठे विजय मिळवलेत.  भारतीय संघाने न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्याविरोधात टी 20 आणि वनडे मालिका जिंकली. त्यानंतर बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. सध्याच्या घडीला तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडिया आघाडीवर आहे. जागतिक क्रिकेटवर टीम इंडिया राज्य करत आहे, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कसोटी, वनडे आणि टी 20 मध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे. आयसीसीने नुकत्याच जारी केलेल्या क्रमवारीनुसार, भारतीय संघासह खेळाडूही क्रमवारीत आघाडीवर आहेत. 


2023 मध्ये वनडे अन् कसोटी अव्वल स्थानावर पोहचला भारत  


2023 मध्ये भारतीय संघ कसोटी आणि वनडे मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याआधी टीम इंडिया टी 20 मध्ये पहिल्या स्थानावर होती. न्यूझीलंडविरोधात मायदेशात झालेल्या तीन सामन्याच्या वनडे मालिकेत भारताने विजय मिळवला होता. त्यासह वनडे अव्वल स्थानावर कब्जा मिळवला होता. न्यूझीलंडविरोधातील वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर होता. ही मालिका भारताने 3-0 च्या फरकाने जिंकत पहिल्या स्थानावर झेप घेतली. 


त्याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर होता. बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव 132 धावांनी पराभव केला. या मोठ्या विजयासह टीम इंडिया पहिल्या स्थानावर पोहचली. या सामन्यापूर्वी आयसीसी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर होता. पण एक डाव 132 धावांच्या विजयानंतर भारतीय संघाने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याशिवाय नागपूर कसोटी शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माच्या कसोटी क्रमवारीतही बदल झाला आहे. रोहित शर्मा याने आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.  


विश्व क्रिकेटवर भारताचाच जलवा -


जागतिक क्रिकेटवर भारतीय संघाचा दबदबा आहे. वनडे, कसोटी आणि टी 20 अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे.  क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याशिवाय काही खेळाडू आयसीसी क्रमवारीत आघाडीवर आहेत. भारताकडे टी-20 तील नंबर 1 फलंदाज आहे. वनडेतील अव्वल गोलंदाज आहे. त्याशिवाय कसोटी क्रमवारीतही भारतीय खेळाडूंचा दमदबा आहे. 


आयसीसी रँकिंगमध्ये भारताचाच दबदबा -


टीम इडिया कसोटीत नंबर 1  


वनडे मध्ये टीम इंडिया नंबर 1


टी 20 मध्ये नंबर 1 टीम इंडिया


टी 20 मध्ये अव्वल फलंदाज - सूर्यकुमार यादव


वनडेतील नंबर 1 गोलंदाज - मोहम्मद सिराज


कसोटीतील नंबर 1 अष्टपैलू - रविंद्र जाडेजा


कसोटीतील नंबर 2 अष्टपैलू खेळाडू - आर अश्विन


कसोटीती नंबर 2 गोलंदाज - आर अश्विन 


टी 20 तील नंबर 2 अष्टपैलू - हार्दिक पांड्या


आणखी वाचा :
ICC Rankings : ऐतिहासिक! वनडे, टी20 नंतर कसोटीतही टीम इंडिया नंबर 1