Rohit Sharma Announces Retirement From Test Cricket : भारतीय क्रिकेट जगतातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी येत आहे. आयपीएलच्या मध्येच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आयपीएलनंतर टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची होती. इंग्लंड दौऱ्यापूर्वी रोहित शर्माने अशा प्रकारे निवृत्तीची घोषणा करणे हा भारतीय चाहत्यांसाठी खूपच आश्चर्यकारक निर्णय आहे. रोहित शर्माने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याच्या टेस्ट कॅपचा फोटो शेअर करून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
रोहित शर्माने भारताकडून कसोटी 67 क्रिकेटमध्ये कसोटी सामने खेळले. या काळात त्याने 12 शतके आणि 18 अर्धशतकांसह 40.57 च्या सरासरीने 4301 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात रोहितने भारताचे नेतृत्व केले. घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धची शेवटची मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर-गावसकर मालिका वगळता कर्णधार म्हणून त्याची कामगिरी खराब राहिली आहे.
इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताला नवीन कसोटी कर्णधार मिळेल, ज्यामध्ये जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत हे संभाव्य दावेदार आहे. 20210 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नागपूर कसोटीत रोहितची कसोटी पदार्पण करण्यासाठी निवड झाली होती, परंतु नाणेफेकी होण्याच्या काही क्षण आधी त्याला दुखापत झाली. रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून केली.
2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली. कोलकाता कसोटीत खेळण्यासाठी त्याला जवळजवळ 3 वर्षे लागले. त्याने पदार्पणातच शतक ठोकले. यानंतर, त्याने मुंबईत झालेल्या पुढच्या कसोटीत आणखी एक शतक झळकावले. पण कसोटी संघात खुप दिवस जागा मिळाली नाही. त्यावेळी त्याने अनेक चढ उतार पाहिले. पण आता रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. गेल्या वर्षी, त्याने 2024 चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
हे ही वाचा -