Gautam Gambhir on Virat Kohli And Rohit Sharma : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी एबीपी माझाच्या इंडिया@2047 समिट या विशेष कार्यक्रमात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भविष्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. कार्यक्रमात गंभीरला विचारण्यात आले की, रोहित आणि विराट 2027 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप खेळणार का? यावर गंभीरने एक मनोरंजक उत्तर दिले.
रोहित-विराट 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का?
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले, "हा दोघांचाही निर्णय असेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दोघेही कसे कामगिरी करतात. जगाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोघांनीही कसे कामगिरी केली हे पाहिले. जोपर्यंत ते खेळत आहेत तोपर्यंत ते संघाचा भाग असतील. जोपर्यंत ते कामगिरी करत राहतील तोपर्यंत ते खेळत राहतील. जर एखादा खेळाडू 40 किंवा 45 वर्षांच्या वयातही चांगली कामगिरी करत असेल तर तो खेळत राहील."
विराट कोहली सोबतच्या मैत्रीच्या प्रश्नावर गौतम गंभीर म्हणाला, मी आणि विराट कोहली मित्र होतो, आहे आणि कायम राहू. प्रत्येकाने हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, जेव्हा तुम्ही मैदानावर वेगवेगळ्या संघांसाठी खेळता तेव्हा तुम्हाला लढण्याचा अधिकार आहे, परंतु मैदानाबाहेर तुमचे नाते कसे आहे हे सर्वांना माहित नाही.
क्रिकेट तुमच्या घरची जहागिरी नाही - गौतम गंभीर
टीकाकारांशी संबंधित प्रश्नावर गंभीर म्हणाला, मी प्रशिक्षक होऊन फक्त 8 महिने झाले आहेत. जर चांगले रिझल्ट आले नाहीत तर लोक माझ्यावर टीका करतील, हे त्यांचे काम आहे, पण काही लोक असे आहेत जे 20-25 वर्षांपासून कॉमेंट्री बॉक्समध्ये बसले आहेत. त्यांनी माझ्या प्रत्येक गोष्टीवर सवाल केले. त्यांना वाटतं की, भारतीय क्रिकेट त्यांच्या घरची जहागीर आहे. मात्र, भारतीय क्रिकेट कोणाच्या घरची जहागीर नाही. त्यांनी माझ्या रेकॉर्ड आणि बक्षीस रकमेसह सर्व गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या