Rohit Sharma and Virat Kohli : रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने 12 वर्षांचा दुष्काळ संपवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलंय. दुबईत खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने 4 विकेट्सने विजय मिळवलाय. दरम्यान, इंडियाच्या विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने हटके सेलिब्रेशन केलंय. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. रोहित आणि विराटने पाहिलेलं वनडे वर्ल्डकपचं स्वप्न तुटलं होतं. त्यावेळी दोघांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले होते. मात्र, आज चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झालाय. 




टी 20 वर्ल्डकपचा किताब जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात आणण्याचा पराक्रम केलाय. दुबईत खेळवण्यात आलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 251 धावा केल्या होत्या आणि टीम इंडियासमोर 252 धावांचे आव्हान ठेवले होते. न्यूझीलंडच्या या आव्हानाचा टीम इंडियाने 4 गडी राखून विजय मिळवलाय. कर्णधार रोहित शर्माच्या 76 धावा आणि फिरकीपटूंच्या जोरावर टीम इंडियाने या अंतिम सामन्यात विजय मिळवलाय. 


भारताविरुद्ध न्यूझीलंडने मिळवलेल्या खालील 4 विजयांचा बदला आज घेतलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 2019 च्या वनडे वर्ल्डकप फायनलमध्येही टीम इंडियाला न्यूझीलंडने बाहेर काढले होते. त्यामुळे आजचा किवींविरोधातील विजय महत्त्वपूर्ण मानला जातोय. 


2000 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल 
2019 वन डे वर्ल्ड कप सेमी फायनल (धोनी run out)
2021 जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल 
2024 भारतात 3-0 कसोटी मालिका 




दुबईत रवींद्र जाडेजाने चौकार मारत टीम इंडियाला विजय मिळवून दिल्यानंतर देशभरात जल्लोष करण्यात येतोय.  टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्येही विजयानंतर जल्लोष सुरु झालाय. विशेषतः रोहित आणि विराटने आपल्या खास सेलिब्रेशन करत चाहत्यांची मने जिंकली आहेत. 


विराट आणि रोहितसाठी हे जेतेपदही खूप खास होते. हे दोन्ही खेळाडू 2013 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयी संघाचा भाग होते.  एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे जेतेपदी दोन्ही खेळाडूंसाठी खूप खास ठरले असते. या दोघांनी मिळून 2017 च्या दुबईतील त्या हृदयद्रावक पराभवाचे दुःख पूर्णपणे काढून टाकले. त्यामुळेच त्यांनी अनोख्याप्रमाणे सेलिब्रेशन केलंय. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


IND vs NZ Final : असा कॅच झेलणे म्हणजे चमत्कारच म्हणावा लागेल, ग्लेन फिलिप्सचा पूर्ण हवेत जात सर्वांची झोप उडवणारा झेल पाहाच Video