IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत असताना 251 धावा केल्या असून टीम इंडियासमोर 252 धावांचे आव्हान ठेवले आहे. दरम्यान, न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने 30.2 षटकांमध्ये 3 विकेट्स गमावत 138 धावांचा टप्पा गाठलाय. सलामीवर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात केल्यानंतर भारताला लागोपाठ तीन झटके बसलेत. मात्र, यामध्ये ग्लेन फिलिप्सने घेतलेला कॅच चर्चेचा विषय ठरलाय. शुभमन गिलने मारलेल्या जोरदार फटक्यानंतर अशक्य वाटणारा कॅच ग्लेन फिलिप्सने पूर्ण हवेत जात पकडण्याचा पराक्रम केलाय. या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
ग्लेन फिलिप्सवर कौतुकाचा वर्षाव
न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेन फिलिप्स प्रत्येक सामन्यात अशाच प्रकारे उत्कृष्टपणे क्षेत्ररक्षण करताना दिसला आहे. यापूर्वीच्या सामन्यात देखील त्याने अशाच प्रकारे झेल पकडण्याचा पराक्रम केला होता. त्याच्या या कॅचमुळे टीम इंडियाची पहिली विकेट पडलीये आणि त्यामुळे टीम इंडियाचा स्कोर संथ गतीने पुढे जाताना दिसतोय. मिचेल सँटनरने 19 वा षटकात ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकत शुभमन गिलला शॉट खेळायला भाग पाडले. त्यानंतर शुभमन गिलने चेंडू जोरदार फटकावला पण फिलिप्स वेगाने आलेला चेंडू एका हातात पकडलाय.
ग्लेन फिलिप्सने विराटचा झेलला होता असाच कॅच
भारताविरुद्ध एकाच स्पर्धेत फिलिप्सचा हा दुसरा असा कॅच आहे ज्याने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जेव्हा हे दोन्ही संघ लीग स्टेजमध्ये आमनेसामने आले तेव्हा फिलिप्सने विराट कोहलीचाही अशाच पद्धतीने कॅच पकडला होता. गेल्या काही वर्षांत, 28 वर्षीय फिलिप्सने जगातील सर्वोत्तम झेल पकडणारा खेळाडू म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे.
रोहित आणि गिल फलंदाजी करत असताना एकतर्फी वाटत असलेल्या सामन्यात आता तीन विकेट्स पडल्यानंतर रंगत आली आहे. 19 व्या षटकात भारताची धावसंख्या 105/0 होती. मात्र, आता तीन विकेट्स पडल्यानंतर टीम इंडियाचा रन रेट कमी झालाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या