Rohit Sharma Watch Price : टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची घोषणा झाल्यानंतर रोहित शर्मानं पत्रकार परिषदेत संबोधित केले. यावेळी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरही उपस्थित होते. यावेळी रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. पण यावेळी चर्चा झाली ती रोहित शर्माच्या घडाळाचीच.. रोहित शर्मानं घातलेलं घड्याळ कोणतं, त्याची किंमत किती? यासारखे प्रश्न चाहत्यांकडून विचारण्यात येत होते. रोहित शर्मानं पत्रकार परिषदेत Patek Philippe Nautilus Platinum 5711 घड्याळ घातलं होतं. या घड्याळाची किंमत दोन कोटींपेक्षा जास्त आहे.


प्रीमियम ब्रँडच्या घडाळाची किंमत किती ?


भारताचा कर्णधार रोहित शर्मा Patek Philippe Nautilus Platinum 5711 हे प्रिमियम ब्रँडचं घड्याळ वापरतोय. या घडाळाची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. होय. Patek Philippe Nautilus Platinum 5711 या घडाळाची किंमत 2 कोटी 16 लाख रुपये इतकी आहे. 


Patek Philippe Nautilus Platinum 5711 या घड्याळाची इतकी किंमत का आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला अशेल. या घट्याळामध्ये खास काय आहे?  रोहित शर्मानं घातलेलं घड्याळ एकदम शानदार आहे. त्याचा लूकतर खास आहेच. त्याशिवाय तांत्रिकदृष्टय्या हे घड्याळ अधिक सक्षम आहे. 






प्रीमियम ब्रँडच्या घड्याळाचा हौशी आहे रोहित शर्मा  


रोहित शर्माकडे एकापेक्षा एक महागड्या आणि प्रिमियम ब्रँडच्या घड्याळाचं कलेक्शन आहे. याआधीही त्याला अनेक महागड्या घड्याळासोबत स्पॉट केलेय. रोहित शर्माकडे Patek Philippe Nautilus Platinum 5711 व्यतिरिक्त Rolex, Hublot आणि Maestro यासारख्या प्रीमियम ब्रँडची घड्याळं आहेत. 


रोहित शर्माचा Patek Philippe Nautilus Platinum 5711 घड्याळ घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेटकऱ्यांमध्ये रोहित शर्माच्या या घड्याळाची जोरदार चर्चा होत आहे. यावर लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव होतोय.  या घड्याळाची किंमत इतकी का आहे? याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे.