Indian Cricket Team, ICC Rankings : आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडियाला मोठा झटका बसलाय. ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला पछाडत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. पण टी20 आणि वनडे क्रिकेट क्रमवारीत भारतीय संघाचा दबदबा कायम आहे. वनडे आणि टी20 क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या स्थानार कायम आहे. कसोटीत मात्र ऑस्ट्रेलियानं अव्वल स्थान पटकावलं आहे. आयसीसीकडून कसोटी, वनडे आणि टी20 संघाची क्रमवारी जारी केली.


कसोटी क्रमवारीमध्ये किती बदल झाला...


आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलियानं अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे 124 रेटिंग गुण आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या टीम इंडियाकडे 120 रेटिंग गुण आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार रेटिंग गुणाचा फरक आहे. इंग्लंडचा संघ 105 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अव्वल स्थानासाठी चुरस आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणारा इंग्लंड संघाकडे रेटिंग गुण 105 आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ 103 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा अपवाद वगळता इतर संघाचे रेटिंग गुण हे 100 पेक्षा कमी आहेत. 2020-21 मध्ये भारतीय संघाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 अशा फरकाने पराभव केला होता. पण कसोटी क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताला झटका दिलाय. 






वनडे आणि टी20 फॉर्मेटमध्ये भारताचा जलवा -


वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा दबदबा आहे. भारतीय संघ वनडे आणि टी20 मध्ये आयसीसी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. आयसीसी वनडे विश्वचषकात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. पण तरीही भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. वनडे, कसोटी आणि टी20 मध्ये भारतीय संघ पहिल्या तीन क्रमांकवर आहे. आगामी टी20 विश्वचषकाआधी भारतीय संघ अव्वल स्थानावर पोहचलाय.