Road Safety World Series 2022: जगभरात रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज खेळवली जाते. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू सहभाग घेतात. भारतात 10 सप्टेंबरपासून रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात झालीय. दरम्यान, बुधवारी भारतीय लीजेंड्स (India Legends vs West Indies Legends) आणि वेस्ट इंडीज लीजेंड्स यांच्यात सामना खेळला जाणार होता. पंरतु, पावसानं या सामन्यात व्यत्यय आणलं. या सामन्याचा एकही चेंडू खेळला गेला नाही. यानंतर आयोजकांनी या स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल केलाय. ज्यामुळं इंडिया लीजेंड्सच्या काही सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणांत बदल झालाय. 


रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या अधिकृत वेबसाईटद्वारे नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. त्यानंतर बांग्लादेश आणि न्यूझीलंड लीजेंड्स यांच्यात 15 सप्टेंबर खेळला जाणार आहे. परंतु, या दिवशी इंग्लंड लीजेंड्स आणि  दक्षिण आफ्रिका लीजेंड्स यांच्यात सामना रंगणार आहे. इंडिया लीजेंड्स आणि इंग्लंड लीजेंड्स यांच्यातील सामना शेड्युल तारीखेच्या आधीच खेळवला जाणार आहे. 


स्पर्धेच्या ठिकाणांत बदल
सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली इंडिया लीजेंड्सचा संघ 24 सप्टेंबरला इयान बेलच्या इंग्लज लीजेंड्सशी भिडणार होता. परंतु, हा सामना 22 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. तर, हा सामना रायपूर ऐवजी देहरादून येथे खेळवला जाणार आहे. या स्पर्धेचे सामने 22 दिवसांत चार ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यावेळी कानपूर, इंदूर, डेहराडून आणि रायपूर येथे सामने होत आहेत. तर, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना रायपूरमध्ये खेळवला जाईल.


सचिन तेंडुलकरकडं इंडिया लीजेंड्सचं नेतृत्व
रस्ता सुरक्षिततेबद्दल जागरूकता पसरवण्याच्या उद्देशानं भारत सरकारच्या रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे आयोजन केलं जातं. भारतीय दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या इंडिया लीजेंड्सच्या संघाची धुरा पुन्हा एकदा दिग्गज सचिन तेंडुलकरकडं सोपवण्यात आलीय. रैना व्यतिरिक्त, गतविजेत्या इंडिया लिजेंड्समध्ये युवराज सिंह, इरफान पठाण, हरभजन सिंह यांसारख्या अनेक स्टार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. 


इंडिया लीजेंड्सचा संघ
सचिन तेंडुलकर (कर्णधार), युवराज सिंह, युसूफ पठाण, इरफान पठाण, हरभजन सिंह, नमन ओझा, सुरेश रैना, प्रज्ञान ओझा, विनय कुमार, मुनाफ पटेल, एस बद्रीनाथ, मनप्रीत गोनी, राहुल शर्मा, राजेश पवार, अभिमन्यू मिथुन, स्टुअर्ट बिन्नी.


हे देखील वाचा-