Kamran Akmal: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलच्या (Kamran Akmal) घरात बकऱ्याची चोरी (Goat Stolen) झाल्याची माहिती समोर येत आहे. बकरी ईदला कुर्बानी देण्यासाठी कामरान मलिकनं सहा बकऱ्यांची खरेदी केली होती. परंतु, बकरी ईदच्या (Bakrid) पूर्वीच त्याच्या घरातून एका बकऱ्याची चोरी झालीय. कामराम अकमलच्या घरातून बकऱ्याची चोरी झाल्याची माहिती सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. 


बकरी ईदच्या एकदिवसआधीच चोरी
पाकिस्तानची न्यूज वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, कामरानच्या वडिलांनी बकरी ईदला कुर्बानी देण्यासाठी सहा बकऱ्यांची खरेदी केली होती. या सर्व बकऱ्यांना घराबाहेर बांधलं गेलं होतं. परंतु, बकरी ईदच्या काही तासांपूर्वीच यातील एक बकरा चोरीला गेला. या बकऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक माणूस ठेवला होता. परंतु, तो झोपल्यानंतर चोरट्यांनी एक बकरा चोरून नेला. 


बकऱ्याची चोरी झाल्याची माहिती तुफान व्हायरल
कामरान अकमलच्या घरातून बकऱ्याची चोरी झाल्याची माहिती प्रचंड वेगानं सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ही माहिती वाचल्यानंतर अनेक सोशल मीडियावर वापरकर्ते आपली प्रतिक्रिया देत आहेत. या वर्षी  9 जुलै म्हणजेच उद्याच बकरी ईद साजरी केली जाणार होती. 


कामरान अकमलची कारकिर्द
कामरान अकमल पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू आहे. त्यानं पाकिस्तानसाठी अखेरचा कसोटी सामना ऑगस्ट 2010 मध्ये खेळला होता. तर, एकदिवसीय सामना 2017 मध्ये एप्रिल महिन्यात खेळला होता. त्यानं टी-20 क्रिकेटमध्येही पाकिस्तानच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. अकमलनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 हजार 236 धावा आणि कसोटी क्रिकेटमध्ये 2 हजार 648 धावा केल्या आहे. 



हे देखील वाचा-