Jos Buttler vs Bhuvneshwar Kumar: तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं इंग्लंडला (ENG vs IND) 50 धावांनी पराभूत करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) उत्कृष्ट कामगिरी बजावली. महत्वाचं म्हणजे, या सामन्यातही भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) पु्न्हा एकदा इंग्लंडचा टी-20 कर्णधार जोस बटलरवर (Jos Buttler) भारी पडलाय. भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या जोस बटलरला भुवनेश्वर कुमारनं शून्यावर बाद करून माघारी घाडलं. दरम्यान, भुवनेश्वर कुमार विरुद्ध जोस बटलर सामन्यात आतापर्यंत कोणाचं पारडं जडं राहिलंय? हे जाणून घेऊयात. 


भुवनेश्वर कुमार विरुद्ध जोस बटलर
या सामन्यात रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं इंग्लंडसमोर 20 षटकात 8 विकेट्स गमावून 199 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याच पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. इंग्लंडच्या डावातील पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारनं जोस बटलरला शून्यावर बाद करून आपली दहशत कायम ठेवली. टी-20 क्रिकेटमध्ये जोस बटलरनं आतापर्यंत भुवनेश्वर कुमारचे 67 चेंडू खेळून 64 धावा केल्या आहेत. तर, चार वेळा विकेट्स गमावली आहे. 


भारतीय युवा खेळाडूंचं दमदार प्रदर्शन
इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय युवा खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं. आयर्लंड दौऱ्यावर टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळणाऱ्या दीपक हुडानं इंग्लंडविरुद्ध सामन्यातही आपली भूमिक स्पष्ट केली. त्यानं मैदानात दाखल होताच आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. त्यानं 17 चेंडूत 33 धावा केल्या. त्यानंतर अर्शदीपनं गोलंदाजीत आपली छाप सोडली. त्यानं आपलं पहिलचं षटक निर्धाव टाकून इंग्लंडच्या संघाला आव्हान दिलं. या सामन्यात त्यानं 33. षटक टाकून 18 धावा देत दोन विकेट्स मिळवल्या.


हे देखील वाचा-