Aaron Finch : सध्या क्रिकेट जगतातील सर्वात आवडता क्रिकेट प्रकार असणाऱ्या टी20 क्रिकेटचा  विश्वचषक (ICC T20 World Cup 2022) यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात पार पडणार आहे. या भव्य स्पर्धेपूर्वी ऑरॉन फिंच, शेन वॉटसन, वकार यूनिस आणि मोर्ने मोर्कल या दिग्गजांनी 'विश्व कप ट्रॉफी टूर'चा शुभारंभ केला. यंदा टूर्नामेंटमध्ये 16 देशांचे दिग्गज क्रिकेटर सामिल होणार आहेत. यावेळी गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार आरॉन फिंचचा संघ मायदेशात पुन्हा एकदा विश्वचषक उंचवण्याचा प्रयत्न करेल.


दरम्यान या भव्य स्पर्धेपूर्वी फिंच म्हणाला,"ही जागतिक क्रिकेटसाठी एक रोमहर्षक वेळ आहे, यावेळी अनेक जागतिक स्तरावरील टॉपचे संघ सामिल होणार आहेत. आता या स्पर्धेला केवळ 100 दिवस बाकी आहेत. यात 16 आघाडीचे संघ टी20 क्रिकेटमधील सर्वात महत्त्वपूर्ण चषक जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये एकमेंकाविरुद्ध लढतील. यामुळे उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे."


ऑक्टोबरपासून रंगणार टी20 विश्वचषक


ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.


यंदाच्या विश्वचषकात कसे असतील ग्रुप?


ग्रुप-1: इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान आणि अन्य दोन क्वालिफायर 
ग्रुप-2: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि अन्य दोन क्वालिफायर 


हे देखील वाचा-