ENG vs IND 1st T20: इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) वन मॅन शो पाहायला मिळाला. साउथॅम्प्टनच्या द रोज बाऊल स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात हार्दिक पांड्यानं चमकदार कामगिरी बजावली. त्यानं फलंदाजीसह गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. या कामगारीच्या जोरावर हार्दिक पांड्यानं खास विक्रमाला गवसणी घातलीय. टी-20 क्रिकेटच्या एका सामन्यात 50+ धावा आणि चार विकेट्स घेणाऱ्या गोलदाजांच्या पंक्तीत त्यानं स्थान मिळवलं आहे.
इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या हार्दिक पांड्यानं 29 चेंडूत 51 धावांची खेळी केली. त्यानंतर इंग्लंडच्या चार फलंदाजांना माघारी धाडून विक्रम रचला. या सामन्यात त्यानं 33 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या आहेत. भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या हार्दिक पांड्याला या सामन्यात समानावीर म्हणून गौरवण्यात आलं.
टी-20 क्रिकेटमधील एका सामन्यात 50+ धावा आणि चार विकेट्स घेणारे गोलंदाज
क्रमांक | क्रिकेटपटूंचं नाव | धावा | विकेट्स | विरुद्ध संघ | विरुद्ध संघ कधी |
1 | ड्वेन ब्राव्हो | 66 | 4/38 | भारत | 2009 |
2 | शेन वॉटसन | 59 | 4/15 | इंग्लंड | 2011 |
3 | मोहम्मद हाफिज | 71 | 4/10 | झिम्बॉव्वे | 2011 |
4 | हार्दिक पांड्या | 51 | 4/33 | इंग्लंड | 2022 |
भारतानं 50 धावांनी पहिला टी-20 सामना जिंकला
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 50 धावांनी विजय मिळवला आहे. भारताच्या विजयात हार्दिक पांड्यानं मोलाचा वाटा उचलला आहे. त्यानं फलंदाजीसह गोलंदाजीतही दमदार कामगिरी करून दाखवली आहे. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या हार्दिक पांड्यानं 29 चेंडूत 51 धावांची खेळी केली. त्यानंतर भेदक गोलंदाजी करत इंग्लंजच्या चार फलंदाजाला माघारी धाडलं. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
हे देखील वाचा-
- Arshdeep Singh: यालाचं म्हणतात संधीचं सोनं करणं, पदार्पणाच्या सामन्यात अर्शदीप सिंहची चमकदार कामगिरी
- ENG vs IND 1st T20: रोहित शर्माचा वर्ल्ड रिकॉर्ड! सलग 13 टी-20 सामने जिंकणारा पहिला कर्णधार
- ENG vs IND: टी-20 मध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार, रोहित शर्मानं मोडला विराटचा खास विक्रम!