Rishabh Pant playing marbles game : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) फक्त क्रिकेटचं नाही. तर भारतातील प्रत्येक गल्लीत लोकप्रिय असलेल्या गोट्यांचा खेळही अतिशय चांगल्या पद्धतीने खेळताना दिसतोय. इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएल 2024 मधून ऋषभ पंत पुनरागमन करण्याच्या चर्चा सुरु असतानाच ऋषभ पंतने (Rishabh Pant) गोट्या खेळत असलेला व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ऋषभ (Rishabh Pant) लहान मुलांसमवेत गोट्या खेळताना दिसतोय. त्याने गोट्या खेळताना चेहरा मास्कने झाकलेला आहे. त्याच्या शेजारील लहान मुलांसोबत त्याने गोट्या खेळण्याचा आनंद लुटलाय. 


भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, एनसीएकडून 5 मार्च रोजी ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) पुनरागमनाची घोषणा करण्यात आहे. ऋषभ पंतचा 31 डिसेंबर 2022 रोजी अपघात झाला होता. तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलही खेळलेला नाही. 22 मार्चपासून आयपीएलचा 17 हंगाम सुरु होणार आहे. ऋषभ पंतचे फिट असणे हे भारतीय संघ आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी महत्वपूर्ण आणि दिलासादायक बाब असणार आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) आता आयपीएलमध्ये यष्टीरक्षक म्हणून उतरवले जाणार नाही, असे गांगुली यांनी म्हटले आहे. 






ऋषभ पंत आयपीएल खेळण्यासाठी फिट 


ऋषभ पंत (Rishabh Pant) अपघातातून पूर्णपणे सावरला असून तो आता पूर्णपणे फिट झाला आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसू शकतो, असे बोलले जात आहे. अपघात झाल्यानंतर ऋषभला आयपीएलच्या 16 व्या हंगामाला मुकावे लागले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वार्नर याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, वॉर्नरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सला चांगली कामगिरी करता आली नाही. 


दिल्ली कॅपिटल्स ऋषभच्या पुनरागमनासाठी उत्सुक 


दिल्ली कॅपिटल्सचा संघ ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) पुनरागमनासाठी उत्सुक आहे. कारण गेल्या हंगामात तो नसताना दिल्लीची आयपीएलमधील कामगिरी सुमार राहिली होती. त्यामुळे दिल्ली त्याचे दमदार पुनरागमन व्हावे, यासाठी उत्सक आहे. दिल्ली कॅपिटल्सचा 2024 च्या हंगामातील पहिला सामना 23 मार्च रोजी पंजाब किंग्जविरोधात खेळवला जाणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


"रिश्ते में तो हम तुम्हारे कैप्टन लगते हैं, नाम है हार्दिक पांड्या"; मुंबई इंडियन्सच्या नव्या कॅप्टनचा रोख नेमका कुणीकडे?