Rishabh Pant: श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं 238 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं 2-0 अशी मालिका विजयाची नोंद केली. त्याआधी श्रीलंकाविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी-20 मालिकेतही भारतानं 3-0 फरकानं श्रीलंकेला पराभवाची धुळ चाखली. भारताच्या मालिका विजयानंतर यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या नावाची चर्चा अधिक रंगली आहे. ऋषभ पंतला संधी मिळूनही त्याला चांगली कामगिरी करता न आल्यानं मोठ्या प्रमाणात त्याच्यावर टीका केली जात होती. परंतु, त्यानं गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या खेळात चांगली सुधारणा करीत टीकाकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलंय. 


ऋषभ पंतन 2021 पासून कसोटी क्रिकेटमध्ये 1077 धावा केल्या आहेत. या कालावधीत भारतासाठी सर्वाधिक धावा करणार तो फलंदाज ठरला आहे. त्याच्याशिवाय कोणत्याही फलंदाजाला हजारांचा टप्पा गाठता आलेला नाही. ऋषभनंतर रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमध्ये 996 धावा केल्या आहे. त्यापाठोपाठ चेतेश्वर पुजारा 810 धावांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, भारताचा माजी कर्णधार या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानं 725 धावा केल्या आहेत. 


ऋषभ पंतनं महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला
ऋषभ पंतने भारतासाठी यष्टिरक्षक म्हणून पहिल्या 50 डावात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या 50 डावात 1870 धावा केल्या आहेत. याआधी हा विक्रम भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावावर होता. धोनीनं 50 डावात 1870 धावा केल्या आहेत. त्यानंतर फारूख इंजिनियरचा क्रमाकं लागतो. त्यानं 1497 धावा केल्या होत्या. याशिवाय, नयन मोंगियानं 1236 आणि रिद्धिमान साहानं 1115 धावा केल्या आहेत. 


हे देखील वाचा- 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha