VVS Laxman and Rahul Dravid : भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांना कसोटी क्रिकेटमधील दिग्गज मानलं जातं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अप्रतिम खेळींचं प्रदर्शन घडवलं. या ऐतिहासिक कामगिऱ्यांमधील एक म्हणजे आजपासून 21 वर्षांपूर्वी कोलकात्याच्या मैदानात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळलेली एक कसोटी... या सामन्यात लक्ष्मणने दुहेरी शतक तर द्रविडने 180 धावांची दमदार खेळी केली होती.
तर वर्ष होतं 2001. ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा सुरु होता. दोन्ही संघामध्ये कसोटी मालिका सुरु होती. मालिकेतील दुसरी कसोटी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवली जात होती. 11 मार्चपासून सामना सुरु झाला असताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर भारतीय संघ अवघ्या 171 धावांवर ऑल आउट झाला. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला फॉलऑन दिला. भारताने याचाच फायदा उचलत 7 विकेट गमावत 657 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आणि दुसरा डाव घोषित केला. यावेळी शिव सुंदर दास आणि सदगोप्पन रमेश सलामीला आले, शिव 39 रन आणि रमेश 30 धावा करुन तंबूत परतले. नंतर सचिन तेंडुलकर 10 तर सौरव गांगुली 48 धावा करुन बाद झाले. पण त्यानंतर मैदानात आलेल्या लक्ष्मण आणि द्रविड जोडीने धमाकेदार फलंदाजी केली. लक्ष्मणने 452 चेंडूत 281 धावा केल्या यात त्याने तब्बल 44 चौकार लगावले. तर दुसरीकडे द्रविडने 353 चेंडूत 20 चौकार लगावत 180 रन केले. त्यांनी उभारलेल्या या दमदार स्कोरनंतर भारतीय गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी करत 212 धावांवर कांगारुंना सर्वबाद करत सामना 171 धावांनी जिंकत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
हे देखील वाचा-
- Kapil Dev : भारताचे महान ऑलराऊंडर कपिल देव यांचा आवडता ऑलराऊंडर खेळाडू माहित आहे का?
- Virat Kohli : कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते मैदानात, पुढे विराटने जे केले ते तुम्हीच पाहा
- IND vs SL Test : श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी, अर्धशतक ठोकत नवा रेकॉर्ड केला नावावर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha