IND vs SL 2nd Test Live: भारतानं कसोटी मालिका जिंकली, श्रीलंकेचा 238 धावांनी पराभव
India vs Sri Lanka 2nd Test Score Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) दोन सामन्यांच्या मालिकेतील अखरेचा सामना खेळला जात आहे.
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Mar 2022 05:48 PM
पार्श्वभूमी
India vs Sri Lanka 2nd Test Score Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) दोन सामन्यांच्या मालिकेतील अखरेचा सामना खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या...More
India vs Sri Lanka 2nd Test Score Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) दोन सामन्यांच्या मालिकेतील अखरेचा सामना खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतानं दुसरा डाव 9 बाद 303 धावांवर घोषित केला आणि श्रीलंकेपुढे दुसरा कसोटी क्रिकेट सामना जिंकण्यासाठी 447 धावांचे आव्हान ठेवलं. या या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची दिवसअखेर 1 बाद 28 अशी स्थिती होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 252 धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेचा संघ 109 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतानं दुसरा डाव 9 बाद 303 धावांवर घोषित केला. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला आणखी 419 धावांची गरज आहे. तर, या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारताला 9 विकेट्सची आवश्यकता आहे. सध्या सामना भारताच्या बाजूनं झुकलेला दिसत आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज कशी कामगिरी बजावतात? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्यासाठी मैदानात उतरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिलीच कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघानं एक डाव आणि 222 धावांनी जिंकला होता. या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय आहे. भारताचा कसोटी संघ:मयंक अग्रवाल, रोहित शर्मा (कर्णधार), हनुमा विहारी, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.श्रीलंकेचा कसोटी संघ:दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो, प्रवीण जयविक्रमा.हे देखील वाचा- IND vs SL : रोहित शर्माच्या षटकाराने प्रेक्षकाचं नाक फुटलं; हाड फ्रॅक्चर, टाकेही घातलेVirat Kohli : कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते मैदानात, पुढे विराटने जे केले ते तुम्हीच पाहाIND vs SL Test : श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी, अर्धशतक ठोकत नवा रेकॉर्ड केला नावावरLIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND Vs SL: भारतानं कसोटी मालिका जिंकली, श्रीलंकेचा 238 धावांनी पराभव
बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर श्रीलंकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं 239 धावांनी विजय मिळवला आहे.