Rohit Sharma Captaincy : भारतानं श्रीलंकेला दुसऱ्या कसोटीत 238 धावांनी मात देत मालिकाही 2-0 ने खिशात घातली आहे. विशेष म्हणजे भारतीय भूमीत भारताचा हा सलग 15 वा मालिका विजय असून कर्णधार रोहित शर्माची यात मोठा वाटा आहे. रोहित कर्णधार झाल्यापासून भारताचा हा सलग 14 वा आंतरराष्ट्रीय सामन्यातील विजय आहे. तर पाचवा मालिका विजय आहे. विशेष म्हणजे या साऱ्या मालिकेत भारताने  प्रतिस्पर्धी संघाला व्हाईट वॉश दिला आहे.


भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) हा सामना पार पडला. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 252 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या संघाला भारताने 109 धावांवर सर्वबाद केले. तर त्यानंतर दुसऱ्या डावात भारतानं 9 बाद 303 धावांवर डाव घोषित केला. ज्यामुळे श्रीलंकेला सामना जिंकण्यासाठी 446 धावांची गरज होती. पण भारताने श्रीलंकेला 208 धावांत सर्वबाद केल्याने भारत 238 धावांनी सामना जिंकला. याआधीचा मालिकेती पहिला सामना भारताने एक डाव 222 धावांनी जिंकला होता. तर त्याआधी श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिकाही 3-0 ने जिंकली होती. त्याआधी वेस्ट इंडीजला टी20 आणि एकदिवसीय मालिकांमध्ये 3-0 आणि 3-0 ने भारताने मात दिली होती. तर त्याआधी कर्णधार झाल्यानंतर पहिलीच मालिका खेळताना रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताने न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिका 3-0 ने जिंकली होती. 


भारताचा मायदेशात सलग 15 वा विजय


या विजयासह भारतानं घरच्या मैदानावर सलग पंधरावी कसोटी मालिका जिंकलीय. 2012-13 साली भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत भारतानं अखेरची मालिका गमावली होती. त्यानंतर भारतानं मायदेशात सलग 15 कसोटी मालिका जिंकली आहे. तर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिली कसोटी मालिकेवर विजय नोंदवलाय. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha