ICC Men's Player Of The Month: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं आज (14 मार्च) फेब्रुवारी 2022 साठी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूची घोषणा केली. भारताचा तडाखेबाज फंलंदाज श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) फेब्रुवारी महिन्यातीलआयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार जिंकलाय. श्रेयसनं नुकतीच पार पडलेल्या श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिकेत धमाकेदार फलंदाजी केली होती. श्रीलंकाविरुद्ध खेळण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरनं सलग तीन अर्धशतक केलं होतं. ज्यामुळं आयसीसी प्लेयर ऑफ द मंथसाठी त्याला नामांकित करण्यात आलं होतं. या यादीत यूएई आणि नेपाळच्या क्रिकेटपटूंचाही समावेश करण्यात आला होता. परंतु, अखेर श्रेयस अय्यरनं सर्वांना मागं टाकत प्लेअर ऑफ मंथचा पुरस्कार जिंकलाय. तर, महिला क्रिकेटरमध्ये भारताच्या दोन क्रिकेटपटूंना मागे टाकून न्यूझीलंडच्या अमेलिया केर प्लेअर ऑफ मंथचा पुरस्कार जिंकलाय. 


श्रीलंकाविरुद्ध श्रेयय अय्यरची दमदार खेळी
श्रीलंकाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरनं दमाकेदार खेळी केली होती. याच कामगिरीच्या जोरावर त्यानं प्लेअर ऑफ मंथचा पुरस्कार जिंकलाय. श्रीलंकाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात श्रेयस अय्यरनं नाबाद 57 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या टी-20 सामन्यात 74 आणि तिसऱ्या टी-20 सामन्यात 73 धावांची नाबाद खेळी केली होती. या मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीमुळं त्याला मालिकावीर म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं. 


अमेलिया केरची भारताविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी
न्यूझीलंडची ऑलराऊंडर अमेलिया केरनं महिला क्रिकेटपटूमध्ये प्लेअर ऑफ मंथचा पुरस्कार जिंकलाय. या यादीत भारताची कर्णधार मिताली राज आणि दिप्ती शर्मा यांच्या नावाचा समावेश होता. अमेलिया केरनं भारताविरुद्ध व्हाईट बॉल मालिकेत दमदार फलंदाजी केली होती. तिनं भारताविरुद्ध खेळण्यात आलेल्या आलेल्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 353 धावा केल्या होता. तर, 7 विकेट्स पटकावले होते. तसेच भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळण्यात आलेल्या एकमेव टी-20 मालिकेत तिनं 17 धावा देऊन 2 विकेट्स मिळवले होते. या मालिकेतील दुसऱ्या आणि चौथ्या एकदिवसीय सामन्यात तिनं सामनावीरचा पुरस्कार जिंकला होता. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha